yuva MAharashtra सांगलीच्या लाडक्या बहिणींनी पृथ्वीराजबाबांनाच निवडून आणण्याचा चंग - विजया पाटील

सांगलीच्या लाडक्या बहिणींनी पृथ्वीराजबाबांनाच निवडून आणण्याचा चंग - विजया पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० नोव्हेंबर २०२
गेली १० वर्षे पायाला भिंगरी बांधून सांगलीकरांच्या सेवेसाठी पृथ्वीराजबाबा काम करत आहेत. महापुरात पूरप्रवण क्षेत्रातील अनेक महिलांचे संसार वाचवण्यासाठी त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करुन पूर ओसरु पर्यंत त्यांची सगळी व्यवस्था केली. पूर ओसरल्यानंतर त्यांच्या घराची परिसराची स्वच्छता, निर्जंतुकीकरणासाठी गाड्या पाठवून औषध फवारणी केली. कोरोना काळात त्यांनी औषधे, सॅनिटायझर व कोविड सेंटरमध्ये व्यवस्था करुन जीवदान दिले. अनेक माय भगिनींचे सौभाग्य सुरक्षित ठेवले. त्यामुळे पृथ्वीराजबाबा हेच खरे लाडके भाऊ आहेत अशी सांगलीकर महिलांची भावना आहे. असे प्रतिपादन सौ पूजा पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना केले.

यावेळी बोलताना अशोक पाटील पुढे म्हणाल्या की, सांगली विधानसभा मतदारसंघातील महिला आता पृथ्वीराजबाबांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. पृथ्वीराजबाबांचे काँग्रेस पक्षाचे आणि सांगलीकरांच्या हिताचे काम पाहूनच त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी दहा वर्षे या मतदारसंघाची मशागत केली आहे. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. असे प्रतिपादन विजया पाटील यांनी केले.


महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, पृथ्वीराजबाबा यांचे मतदान यंत्रामध्ये २ नंबरवर नाव आहे. त्यांच्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊन सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यांना पाच वर्षे आमदार म्हणून संधी द्यावी.

यावेळी महागाई, बेरोजगारी, महिलावरील अत्याचार या विषयावर भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. महिलांचे जीवन धोक्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीच्या अकार्यक्षम आमदाराला बदलण्यासाठी सांगलीकर महिला पुढे सरसावल्या आहेत अशा प्रतिक्रिया यावेळी महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. 

यावेळी आशा पाटील, प्रणिता पवार, ज्योती सुर्यवंशी,कविता बोंद्रे, सुवर्णा पाटील, जयश्री घोरपडे, ज्योती आदाटे,भारती भगत, संगिता हारगे, विद्या कांबळे, नूतन पवार, प्रियांका पाटील, कांचन तुपे,मालन घाडगे, संगिता पवार, क्रांती कदम, शोभा पवार, छाया जाधव, आश्विनी देशपांडे, उज्ज्वला निकम, प्रतिक्षा काळे, जन्नत व शमशाद नायकवडी, राणी कामटे, अनिता शिवशरण, रेहान शेख, सुरेखा सातपुते, सुरेखा हेगडे, अनिता चोपडे, संगिता जाधव व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.