| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ४ नोव्हेंबर २०२४
कुठलेही राज्य सरकार असो किंवा केंद्रातील सरकार. त्यांच्या विरोधात असलेले पक्ष नेहमीच सत्तास्थानी असलेल्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असतात. यासाठी कागदोपत्री पुरावाही दाखल केला जातो. अशा आरोपाबाबत महाराष्ट्रातील भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे नाव नेहमीच आघाडीवर असते. अगदी स्थानिक पातळीवर हे हाच भ्रष्टाचाराचा मुद्दा कायम चर्चिला जातो. पण आपणास ठाऊक आहे का ? एका पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीच्या जावयाने भारतातील पहिला मोठा घोटाळा उघडतीस आणला होता, आणि संबंधित मंत्र्याला यावरून राजीनामा देण्यास भाग पाडले होते.
आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की हा जावई कोण ? तर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे जावई आणि श्रीमती इंदिरा गांधी यांचे पती, रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन खासदार स्व. फिरोज गांधी हे त्यांचे नाव. तर संबंधित मंत्र्याचे नाव होते हरिदास मुंदडा. सन 1957 चे हे प्रकरण...
तो दिवस होता 16 डिसेंबर 1997 चा. सभागृहात, त्यावेळी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या हिशोबावर आणि गुंतवणुकीवर चर्चा सुरू होती. यावेळी फिरोज गांधी यांनी मुंदडा यांच्यावर आरोप करताना गुंतवणुकी विषयीची माहिती लपविण्यात आल्याने तसेच मुद्रा यांच्याशी झालेल्या महत्त्वाच्या व्यवहाराची माहिती लपवण्याचा आरोप केला. मुलगा यांच्यासह सरकारलाही वेठीस धरले.
फिरोज गांधी यांनी आरोप करताना म्हटले की भारतीय आयुर्विमा महामंडळाने मुंदडा यांच्याशी स्वतंत्र वाटाघाटी करून त्यांच्या कंपनीचे शेअर्स सुमारे एक कोटी 24 लाख 44 हजार रुपयांना खरेदी केले. मार्च ते सप्टेंबर 1957 या सहा महिन्याच्या कालावधीत 19 वेळा मुजरा यांच्या कंपनीतील एक कोटी 56 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले. विशेष म्हणजे यावेळी कलकत्ता आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बंद होते.
फिरोज गांधी यांनी संपूर्ण कागदपत्रासह केलेल्या आरोपामुळे जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हरिदास मुंदडा यांना या साऱ्या प्रकरणात. काळाच्या ओघात हे प्रकरण मागे पडले, आणि यावर विस्मरणाचा पडदाही पडला. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सत्तर कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणावरून गाजत असलेल्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर, तत्कालीन पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरू यांना चांगलेच महागात पडलेले ही भ्रष्टाचाराचे प्रकरण औत्सुक्याचे ठरावे.