yuva MAharashtra पृथ्वीराज पाटील आपल्यामागे संकटात खंबीरपणे उभे आहेत, पाच वर्षे राबलेत, आता पाच वर्षे संधी द्या : आशा पाटील

पृथ्वीराज पाटील आपल्यामागे संकटात खंबीरपणे उभे आहेत, पाच वर्षे राबलेत, आता पाच वर्षे संधी द्या : आशा पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ नोव्हेंबर २०२
गेल्या पाच वर्षांचा काळ आठवा. कोरोना असो, महापूर असो, सगळ्या संकटात पृथ्वीराज पाटील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ते पाच वर्षे राबले, मी काय करू शकतो, हे दाखवले. आता आपली जबाबदारी आहे, त्यांना पाच वर्षे संधी देण्याची. महिलांनी आपल्या भावी पिढ्यांसाठी सांगली कशी हवी, याचा विचार करून मतदान करावे, असे आवाहन जिजाऊ ब्रिग्रेडच्या अध्यक्षा आशा पाटील यांनी केले.  
सांगली मतदार संघातील उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार बैठकीत त्या बोलत होत्या.

प्रभाग सतरामधील मंगलमुर्ती कॉलनी परिसरात भेटीगाठी घेण्यात आल्या. वसंतराव पुदाले अध्यक्षस्थानी होते. आशा पाटील म्हणाल्या, ‘‘गेल्या निवडणुकीत काठावर पराभूत झालेल्या पृथ्वीराजबाबा दुसऱ्या दिवशी कामाला लागले. केवळ काँग्रेस उभी केली असे नाही, ते प्रत्येक माणसाच्या संकट काळात धावून आले. महापुरातील त्यांचे काम कृष्णाकाठचा माणूस विसरूच शकणार नाही. त्यांनी सांगलीसाठी कष्ट घेतले. येथे कोम्यात गेलेली काँग्रेस जिवंत करून दाखवली. पक्ष तळागाळात नेला.

लोकसंपर्कातील सातत्यात त्यांचा हात धरू शकेल, असा दुसरा नेता सांगलीत नाही.
असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, कोरोना व महापूर काळातील त्यांच्या कामाला तोड नाही. या कामामुळे सांगलीत लोकांचा काँग्रेसवरील विश्वास आणि आस्था वाढली. काँग्रेस श्रेष्ठींनी याची दखल घेतली. महिलांची सुरक्षितता आणि सन्मानासाठी ते रस्त्यावर उतरले. इकडे उमेदारीचा संघर्ष सुरु होता आणि त्याचवेळी ते महिला स्वच्छतागृहासाठी आंदोलन करत होते. महिलांना अशा खंबीर, कणखर भावाचा गरज आहे.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘विद्यमान आमदारांना दहा वर्षे दिली. दोन रस्ते, दोन पूल म्हणजे विकास नव्हे. सांगलीच्या विकासाची कल्पना त्यांनी समजून घेतली नाही. ठेकेदारांच्या हाताला काम मिळाले, चार कार्यकर्ते खूष झाले म्हणजे विकास झाला, असा त्यांचा समज होता. त्यांना उशीरा जाग आली. म्हणून ते माघारी फिरले होते.’’

माधुरी पुदाले, राणी मुंदडा, डॉ. संजय पाटील, डी. जी. मुलाणी, सदाशिव सुर्यवंशी, शांतीनाथ पाटील, श्री. तिप्पण्णावर, क्रांती कदम, राहूल पाटील, शामराव चव्हाण, विलासराव पाटील, डॉ. अरुण गुजर, अशोक शिंदे, सुरेश साळुंखे, आण्णासाहेब झांबरे, शंकरशेट पवार, आरती पडसलगीकर, शरयू पाटील, ऋतिका पुदाले, शोभा व आनंदी पवार, शांता मुंदडा, ज्योती सावंत, शोभा पवार, अशोक शिंदे, भानुदास मोहिते उपस्थित होते.