| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ नोव्हेंबर २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत विजयमाला दादासो अडसूळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली महापालिकेतील सर्व अधिकारी, शहरातील विविध मान्यवर यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सांगली समाचार न्यूज पोर्टलचे संपादक रमेश नेमिनाथ सरडे व डिजिटल 9 न्यूजचे मुख्य संपादक अभिजीत अरविंद शिंदे यांनीही रविकांत अडसूळ यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.
रविकांत अडसूळ कार्यतत्पर अधिकारी म्हणून सर्वांना परिचित असून, अत्यंत मितभाषी व सर्वांना सामावून घेऊन, महापालिकेचे कामकाजात आघाडीवर असतात. त्यामुळे सर्वच क्षेत्रात त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळेच सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची रिघ लागली होती.