yuva MAharashtra मनसे उमेदवाराचा सोदाहरण ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप !

मनसे उमेदवाराचा सोदाहरण ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ नोव्हेंबर २०२
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने
 236 जागा मिळवल्यानंतर महाआघाडीच्या नेत्यांसह मनसेने ईव्हीएम मतदान यंत्राबाबत शंका घेणे सुरू केले आहे. परंतु याबाबत कोणाकडेच ठोस पुरावा नसल्याने मतदार या आरोपावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. अनेकांच्या मते महायुतीने लाडकी बहिण योजनेबाबत भीती घातल्याने, महायुतीला महिलांनी भरभरून मते दिल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर विजय प्राप्त झाला आहे. परंतु मुंबई मधील दहिसर येथे उमेदवाराने उदाहरणासहित ईव्हीएम मशीन बाबत आरोप केल्याने, याबाबत खरोखरच काही घोटाळा झाला आहे का ? अशी शंका उपस्थित होत आहे.

मनसे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश येरुणकर म्हणाले,काही मशीनचे चार्जिंग 99 टक्के होतं, काही मशीनचं चार्जिंग 70 टक्के तर काहींचं 60 टक्के होतं. दोन-दोन दिवस झाल्यानंतर चार्जींग 99 टक्के कसं काय असू शकतं? मी जिथे राहतो...माझ्या घरात चार मतं आहेत. माझी आई, मुलगी, पत्नी आणि स्वत: मी एवढं जण असून देखील मला दोनच मतं कशी? माझ्या आईने, मुलीने किंवा पत्नीने मला मतदान केलं नाही का? अशा प्रकारचा सर्व घोळ आतमध्ये आहे.

गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय. या मतदारसंघात प्रत्येक जण सांगतोय की, आम्ही विद्यमान आमदाराला कंटाळलोय. ते आम्हाला नको आहेत. आम्हाला बदल करायचाय. आमच्या कार्यकर्त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत काय? असा सवालही राजेश येरुणकर म्हणाले.


राजेश येरुणकर यांच्या सहकारी म्हणाल्या, निवडणुका बंद करुन टाका दरवर्षी असं होणार असेल तर अजिबात गरज नाहीये. मागील पाच वर्षांपूर्वी आमचे 5 मशीन फ्रॉड निघाले होते. यांच्याकडचे नंबर वेगळे आणि पोलिंग एजंटचे नंबर वेगळे होते. तरीही हे लोक म्हणतात. प्रोव्हिजन आहे, असंच करावे लागले. आता आम्ही आक्षेप घेतला तर अधिकारी ऐकून घ्यायला तयार नाहीत. असं होतं असेल तर निवडणूक रद्द करा. गणपत पाटील नगरमध्ये अजिबात कामं झालेली नाहीत. तिथे त्यांना लीड मिळतो? 163 मध्ये केवळ आमच्या उमेदवाराला फक्त दोनच मतदान पडलं. तीस वर्ष राजकारणात आहोत, परंतु आतापर्यंत असा प्रकार पहावयास मिळाला नाही असा आरोपही अनेकांनी केला आहे.