yuva MAharashtra दिवाळीतील फटाक्यांनी कानठळ्या बसल्या, आता राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या बॉम्बने राजकीय वातावरण निघणार ढवळून !

दिवाळीतील फटाक्यांनी कानठळ्या बसल्या, आता राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या बॉम्बने राजकीय वातावरण निघणार ढवळून !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ नोव्हेंबर २०२
गेले जवळपास आठ दिवस बाल गोपालांनी दिवाळीतील फटाक्यानी कानठळ्या बसल्या. सध्या महाराष्ट्रात पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीचे वारे वादळ वाहू लागले आहेत. या वादळात अनेकांच्या दांड्या गुल झाल्रा आहेत. तर काहींना आत्ताच आरोप प्रत्यारोपाने कानठळ्या बसू लागले आहेत. उद्या उमेदवार माघारीचा शेवटचा दिवस. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. आणि मग महायुती असो की महाआघाडी एकमेकांवर करणार असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या डागलेल्या तोफामुळे राजकीय वातावरण ढवळून नेणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी आपले स्टार प्रचारकांची यादी तयार ठेवली आहे.

उमेदवार माघारी नंतर प्रचार सभांचा धडाका सुरू होणार आहे. यावेळी विरोधकांच्या निशाणावर असणार आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. लाडक्या बहिण योजनेमुळे सध्या महिला वर्गात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नावाची चलती दिसून येत आहे. त्यामुळे याचा फायदा महावितेला मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे प्रतिपादन महाआघाडीचे नेते शरद पवार यांनी मध्यंतरी केलं होतं. मात्र त्याचवेळी काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना मात्र ही योजना फसवी असून निवडणुकीनंतर जरी महायुती सत्तेत आली तरी बंद होणार असल्याचा प्रचार, योजना अस्तित्वात आल्यापासूनच सुरू केला आहे. तर महायुती सत्तेत आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे नव्हे तर 3000 रुपये देऊ असा पलटवार शिंदे शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी यांच्याकडून केला जात आहे.


महायुती असो किंवा महाआघाडी एकमेकांच्या कुलंगडी हेरून त्यावरून एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न आगामी 15 दिवसात होणार आहे. दरम्यान दोन्ही आघाडीतील बंडखोरी सर्वच पक्षांना भोवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वच राजकीय पक्षातील नाराज इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आता यातील किती बंडोबांना थंड करण्यात या पक्षांना यश येते, यावर राजकीय गणिते फिरणार आहेत. काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या फायद्याची गणिते सोडवून घेतली असून, निवडणूक रिंगणातून आधीच माघार घेतली आहे. आता उर्वरित बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी विविध प्रलोभनांचा वापर करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक रिंगणात कोण उरते, कोण कोणाला नडते, कोण बाजी मारते ? यावर सध्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. राजकीय विश्लेषक (?) तर्क लढवून या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोण सत्तेचा सोपान चढणार ? याबाबत आपली गृहतिके मांडत आहेत. यातून सध्या तरी जनतेची कर्मयोग होताना दिसत आहे...