yuva MAharashtra माजी मंत्री श्री. प्रतीक पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांच्या पाठिंब्यासाठी घेतली जरांगे पाटील यांचे भेट, मात्र भूमिका गुलदस्त्यात !

माजी मंत्री श्री. प्रतीक पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांच्या पाठिंब्यासाठी घेतली जरांगे पाटील यांचे भेट, मात्र भूमिका गुलदस्त्यात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ नोव्हेंबर २०२
सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री श्री. प्रतीकदादा पाटील यांनी श्रीमती जयश्रीताई पाटील यांना मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी नुकतीच आंतरवाली सराटी येथे श्री. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दिवंगत नेते स्व. मदन भाऊ पाटील यांच्या कन्या सौ. सोनिया होळकर याही उपस्थित होत्या. गत लोकसभा निवडणूकीत श्री. प्रतीक पाटील यांनी आपले बंधू, विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री. प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवला होता. त्याचा खा. विशाल पाटील यांना फायदाही झाला होता.


परंतु अद्याप जरांगे पाटील यांची श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या बाबतची भूमिका अधिकृतरित्या जाहीर झाली नसल्यामुळे, सांगली विधानसभा मतदारसंघात क्रांती मोर्चाची निर्मिती भूमिका काय राहणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाची मोठी ताकद आहे. मात्र ही ताकद विविध गटातटात विभागली केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मराठा समाज एक संघपणे जयश्रीताई पाटील यांच्या पाठीशी उभा राहतो, की, ही ताकद श्री. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्याप्रमाणेच, भाजपाचे उमेदवार विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्यात विभागली जाते, हा मुद्दा आहे चर्चेचा विषय ठरला आहे.

असे बोलले जाते की, मराठा समाज हा नेहमी युद्धात जिंकतो मात्र तहात हरतो. पेशवाईच्या काळापासून, अगदी अलीकडे प्रत्येक निवडणुकीत ही बाब अधोरेखित झालेली आहे. त्यामुळे मध्यंतरी सांगलीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून दिली होती. आता हीच एकत्रित 'तरुण मराठा ताकत' यावेळी नेमकी कोणाच्या पारड्यात पडते, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.