yuva MAharashtra प्रभाग क्रमांक १० मधून सुधीरदादांना उच्चांकी मतदान देऊ; पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची बैठकीत ग्वाही !

प्रभाग क्रमांक १० मधून सुधीरदादांना उच्चांकी मतदान देऊ; पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची बैठकीत ग्वाही !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ नोव्हेंबर २०२
गेल्या दहा वर्षात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आमच्या प्रभागाच्या तसेच संपूर्ण सांगली मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव कार्य केले आहे. त्यामुळे सांगली आणखी चांगली आणि समृद्ध करण्यासाठी आम्ही त्यांच्याच पाठीशी ठामपणे राहणार आहोत. प्रभाग क्रमांक दहा मधून त्यांना प्रचंड मताधिक्य देऊ, अशी ग्वाही आज येथे देण्यात आली.

प्रभाग क्रमांक दहामधील भारतीय जनता पक्ष महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अनेक नागरिकांनी सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आणि सांगलीची विकासकामांची प्रतिमा पुन्हा उंचावण्यासाठी तेच सांगलीतून पुन्हा आमदार झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारात ताकदीने सहभागी होऊन त्यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी काम करेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.


यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणाले, सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यांना या निवडणुकीतही आपण फार मोठ्या मताधिक्याने पुन्हा निवडून घ्यायचे आहे. त्यासाठी सर्वांनी कसून आणि नियोजनपूर्वक प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक घरात जाऊन सुधीरदादांनी केलेले काम, तसेच महायुती सरकारने केलेले काम नागरिकांना समजावून सांगायचे आहे. दादांनी मोठ्या प्रमाणात केलेली या प्रभागातील विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवावी.

प्रभाग क्रमांक दहा मधील माकडवाले वसाहत, रेल्वे स्टेशन परिसर, कॉलेज कॉर्नर आदि परिसरात दादांनी अनेक विकास कामे केली आहेत. आप्पासाहेब पाटीलनगरमधील रस्त्याचा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला आहे. या प्रभागात मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यान विकसित करण्यासाठी सुधीरदादांनीच पुढाकार घेतला आहे. येथे लवकरच ते उद्यान साकार होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आमदार गाडगीळ म्हणाले, प्रभाग क्रमांक दहामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते मुन्ना कुरणे, अनारकली कुरणे जगन्नाथ दादा ठोकळे सुरज मामा पवार यांच्या सहकार्याने अनेक विकास कामे केली. यापुढेही या परिसराचा विकास करण्यासाठी निश्चित आराखडा तयार करून काम केले जाईल.

सुधीर दादांनी प्रभाग क्रमांक दहासाठी केलेल्या कामाची यावेळी सविस्तर माहिती दिली. यावेळी मुन्नाभाई कुरणे, अनारकली कुरणे, जगन्नाथ ठोकळे, जमीर कुरणे, प्रियानंद कांबळे, गीताताई पवार , सुरज पवार, विलासभाई शहा स्वाती कोल्हापुरे, धनेश कातगडे, समशेर कुरणे शेरखान कुरणे, शिवाजी वाघमारे, अर्जुन मजले, अरुण आठवले, राजू गस्ते, कोळीमामा, संग्राम घोरपडे, रणजीत सावंत कविराज पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.