| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ नोव्हेंबर २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना सांगलीकर जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. बुधवारी सांगलीकरांशी संवाद साधताना, आम्ही सारे तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन नागरिकांनी त्यांना दिले.
माई घाट व स्वामी समर्थ घाट सांगली येथे योगा क्लब व स्वीमिंग क्लब मेंबर्स संजय चव्हाण, डॉ. चव्हाण, गोपाळ मर्दा, जोशी, संजय थोरात, नियाज तांबोळी व कृष्णामाई जलतरण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सावकार ग्रुपचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक यांच्याशी पृथ्वीराज पाटील यांनी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन येथील नागरिकांनी यावेळी दिले. यानंतर पृथ्वीराज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील भाजी मंडईमध्ये भेट देत तेथील भाजी विक्रेते, भाजी उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी सांगली परिसरातील शेतकरी, भाजीपाला उत्पादक व व्यापारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंभूराज काटकर, रूपेश मोकाशी, अजीज मिस्त्री, बोंद्रे, शीतल सदलगे, योगेश राणे यांनी पृथ्वीराज पाटील यांच्याशी संवाद साधला. या दोन्हीही ठिकाणी नागरिकांनी, तुम्हीच आमचे आमदार असल्याची भावना व्यक्त केली.
गेली दोन महिन्यावरून अधिक काळ "तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं !" की टॅगलाईन घेऊन पृथ्वीराजबाबा पायाला भिंगरी लावून मतदार संघातील विविध घटकाशी संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेऊन, यावरील उत्तर शोधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मृदु भाषा, बोलण्यापेक्षा, मोठमोठी आश्वासने देण्यापेक्षा, समाजाच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांचा भर असल्यामुळे, नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी दिसून येत आहे.