yuva MAharashtra जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या महिलांचा जयश्री पाटील यांना जाहीर पाठिंबा !

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या महिलांचा जयश्री पाटील यांना जाहीर पाठिंबा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ नोव्हेंबर २०२
सांगली विधानसभा अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या महिलांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिल्याचे जिल्हा उपाध्यक्ष वंदनाताई चंदनशिवे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना वंदनाताई चंदनशिवे म्हणाल्या, ४० वर्षानंतर सांगली विधानसभा क्षेत्रात महिला आमदार होणार आहे. महिलांचे प्रश्न सक्षमपणे मांडून महिलांना न्याय देण्यासाठी महिलांनी जयश्री पाटील यांच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. स्वर्गीय मदन पाटील यांचा वारसा जयश्री पाटील पुढे चालवीत आहेत, त्यांना साथ देणे गरजेचे आहे. महिलांच्या विकासासाठी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी हक्काची महिला आमदार असणे आवश्यक आहे. यासाठी जयश्री पाटील यांना निवडून आणणे आवश्यक आहे.


यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वंदनाताई चंदनशिवे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संध्या आवळे, महानंदा गायकवाड, बिस्मिल्ला नदाफ, नंदा जगताप, दिव्यांग जिल्हा सेल्स उपाध्यक्ष राणी कामठे, राष्ट्रवादी दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष आशा पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या.