yuva MAharashtra सांगली महापालिकेचे उप आयुक्त संजीव आहोळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार ! विविध मान्यवरांकडून कौतुक !

सांगली महापालिकेचे उप आयुक्त संजीव आहोळ यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार ! विविध मान्यवरांकडून कौतुक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० नोव्हेंबर २०२
काल दि २९/११/२०२४ रोजी मिरज विभागीय कार्यालय येथे मा संजीव आहोळ उप आयुक्त यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

३०नोव्हेंबर २०२४ रोजी मा संजीव आहोळ उप आयुक्त हे सेवानिवृत्त होत आहेत .त्या निमित्त आज सेवानिवृत्त त्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी अति आयुक्त चंद्रकांत खोसे, अति आयुक्त श्री. रविकांत अडसूळ, उप आयुक्त वैभव साबळे, उप आयुक्त विजया यादव, शिल्पा दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गायकवाड सर , पोतदार महाराज व श्री. श्वेतपद्म कांबळे सामाजिक कार्यकर्ते यांनी यावेळी आपले अनुभव नमूद करून आपले मनोगत व्यक्त केले आहे.


या वेळी संजीव आहोळ यांच्या कन्या श्वेता यांनी श्री आहोळसो यांच्या आज अखेर कर्तव्य कार्यकाळ व त्यांच्या जीवनप्रवास बाबत थोडक्यात अनुभव मांडला.

मा. संजीव आहोळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या सेवा काळात आलेल्या अनुभवामुळे माझे जीवन संपन्न झाले आहे, मी जीवनभर विद्यार्थी म्हणून जीवन जगलो आहे , सांगलीमुळे मला नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या आहेत, भविष्यात जर माझी विविध विकास कामामध्ये कोणत्याही गरज लागली तर मी सदैव तयार असणार आहे असे या वेळी भावना व्यक्त केली आहे.

 सदर कार्यक्रमाचे नियोजन स्वीय साह्य बाबासाहेब माळी आणि त्याच्या टीम यांनी केले होते, सहा आयुक्त म. न. पा प्रशासन, चंद्रकांत खोसे अति आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त शिल्पा दरेकर, वैभव साबळे, विजया यादव, डॉ रवींद्र ताटे, सहा आयुक्त, अनिस मुल्ला, अग्निशमन अधिकारी सुनील माळी , मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद , विनायक जाधव अभियंता विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते, सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.