yuva MAharashtra कडेगाव तालुक्यातील एमआयडीसीत वायूगळती, बाधितांना केले दवाखान्यात दाखल !

कडेगाव तालुक्यातील एमआयडीसीत वायूगळती, बाधितांना केले दवाखान्यात दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ नोव्हेंबर २०२
कडेगाव तालुक्यातील शाळगाव मधील एमआयडीसी मधील म्यानमार केमिकल कंपनी मधून मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाल्‍याची माहिती समोर आली आहे. या विषारी वायूमूळे परिसरातील कित्‍येक लोकांना बाधा झाल्‍याचे समजते आहे. या गळतीमूळे अनेक लोक गंभीर झाले असून यातील 9 लोकांना कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्‍याचे समजले आहे. तर प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत वायुगळती थांबवली.


ही वायू गळती नेमके कशामुळे झाली, आणि त्याचा त्रास परिसरातील किती जणांना झाला याचा नेमका आकडा समोर आला नसला तरी ही संख्या मोठी असल्याचे समजते. दरम्यान या कारखान्यातील वायुगळतीमुळे एमआयडीसी मधील विविध कारखान्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. म्यानमार केमिकल कंपनी प्रमाणेच आता इतर कारखान्यांच्या सुरक्षितेबाबत चौकशी होण्याची आवश्यकता नागरिकांतून व्यक्त होत आहे.