yuva MAharashtra वारणा-कृष्णेच्या संगमावरील ऐतिहासीक श्रीक्षेत्र हरिपूरचा पर्यटन विकास करणार - आ. सुधीरदादा गाडगीळ

वारणा-कृष्णेच्या संगमावरील ऐतिहासीक श्रीक्षेत्र हरिपूरचा पर्यटन विकास करणार - आ. सुधीरदादा गाडगीळ


| सांगली समाचार वृत्त |
हरिपूर - दि. १५ नोव्हेंबर २०२
वारणा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावरील हरिपूर या ऐतिहासिक गावाचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठीचा आराखडा मी शासनाला सादर करणार आहे. त्याची सुरुवात झाली आहेच, यापुढे अधिक निधी उपलब्ध करून एक अव्वल दर्जाचे प्रसिद्ध असे पर्यटन क्षेत्र येथे विकसित करू, अशी ग्वाही आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.

आमदार गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आज हरिपूर येथे प्रचार फेरी काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद तांबवेकर, सरपंच राजश्री तांबवेकर, युवराज बोंद्रे, महेश बोंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

हरिपूर येथे स्वागत कमानीजवळ सुधीरदादांचे आगमन झाल्यावर फटाक्यांच्या आकाशबाजीत आणि ढोलताशाच्या साथीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत दादांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रत्येक घरी महिला त्यांचे औक्षण करीत होत्या.


संभाजी मित्र मंडळ, कृष्णा माता मित्र मंडळ, वंदे मातरम मित्र मंडळ, भोईराज मित्र मंडळ, विजयंता मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ, स्टार मित्र मंडळ, अजिंक्य शिवा मित्र मंडळ, शिंदे वाडा, रणझुंजार मित्र मंडळ, मोरेश्वर मित्र मंडळ अशा प्रमुख प्रमुख मार्गावरून प्रचार फेरी निघाली. प्रचार फेरीच्या वेळी नागरिकांना भेटत होते त्यांच्याशी बोलत होते.