yuva MAharashtra अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांचा जाहीरनामा प्रसिद्ध !

अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांचा जाहीरनामा प्रसिद्ध !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ नोव्हेंबर २०२
सांगलीत सिटीझन ग्रुप, महिला सक्षमीकरण, सुसज्ज आठवडा बाजार उभारणार, खेळाडूंसाठी सुविधा, नागरी समस्यापासून हमाल, माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांनी जाहीरनाम्यातून दिल्या.

जयश्री पाटील यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन काल करण्यात आले. जाहिरनाम्यात मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासावर भर देण्यात आला आहे. सध्या महापालिका क्षेत्रामध्ये रस्त्यावर आठवडे बाजार भरवले जात आहेत. रस्त्यावरील बाजार बाजुला करून ते मोकळ्या जागेत आधुनिक भाजी मंडईत स्थलांतरीत करणार आहोत. या मंडईत पार्किंग, महिलांना स्वच्छता गृह, जेष्ठ नागरिकांना विसावा, पिण्याच्या पाण्याची सोय, सी.सी.टी. व्ही कॅमेरा, लहान मुलांसाठी बंदीस्त खेळणी आदी सोई सुविधा असणार आहेत. शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सांगलीत राबविला जाईल. शहरात अद्याप पार्किंग व्यवस्था करू. दिल्लीतील आप सरकारच्या धर्तीवर शाळा व मोहला क्किनिक विकसित केले जातील. सांगलीला क्रीडा क्षेत्राची मोठी परंपरा आहे. खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र दालन निर्माण केले जाईल. कबड्डी, खो-खो, कुस्ती या खेळासाठी जास्तीत जास्त सुविधा निम णि केल्या जातील. सांगली विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांच्या मद‌तीसाठी सांगली सिटीझन ग्रुपची निर्मिती, महिलांच्या सक्षमीकरणावर भर, महिला अत्याचार व गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारणार. 

विधानसभा मतदारसंघातील जेष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि मदतीसाठी सांगली सिटिझन्स ग्रुपची निर्मिती करणार आहोत. त्यासाठी स्वयंसेवकाची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. आपत्कालीन स्थितीत हा ग्रुप मदतीला धावून येईल.


शहरात ई-व्हीबस आणि ईव्ही रिक्षा सेवा सुरू करेन. यासाठी ईव्ही चे उद्ययावत चार्जिंग स्टेशन उभे केले जाईल. कृष्णा नदीवर जल प्रकल्प बांधणार आहे. तिथे हायड्रो प्रोजेक्ट उभा करून दोन मेगावॉट वीज तयार होऊ शकते. कोल्हापूर रंकाळा धर्तीवर पर्यटन केंद्र म्हणून तो विकसित केला जाईल. तसेच दोन्ही घाटावर वॉकिंग ट्रॅक उभा करणार.

सांगलीतील स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकाचे अपूर्ण कामाचा पाठपुरावा करू. शेरीनाल्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. शहरातील गॅसलाईनचे काम प्रलंचित आहे, ते पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू. महिलांच्यासाठी घरगुती गॅस कनेक्शन लवकरात लवकर घरोघरी पोहचवू, तसेच सांगली आणि कुपवाड शहरातील ड्रेनेज प्रकल्पही मार्गी लाबू,

सांगली शहराकरिता वारणेचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी मदनभाऊ आग्रही होते. ही योजना सत्त्यात उतरावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन वारणेचे पाणी सांगली शहराला देण्याचा प्रयत्न करणार,

महिलांसाठी उद्योग व्यवसायकरिता पुढाकार, महिलांना स्वयंरोजगार, कौशल्य विकास व स्वनिधी या माध्यमातून शासकीय स्तरावर अर्थसहाय्य, कमकुवत गट व बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनवणार, महिला उद्योजकांसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार. महिला उद्योग उभा करून रोजगार निर्मितीचा प्रयत्न करणार, अंगणवाडी सेविका, मध्यान्ह भोजन बनवणाऱ्या महिला, आशा वर्कर यांचे पगार वाढवण्यासाठी पाठपुरावा करणार, महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी सांगली शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारणार, सांगली महापालिका क्षेत्रात गर्दीच्या व वर्दळीच्या ठिकाणी महिलांच्यासाठी स्वच्छतागृहे उभारणार. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षणासाठी प्रयत्न करेन. घरेलू महिला कामगार, मोलकरिण यांच्याकरिता माथाडी बोर्डाच्या धरतीवर घरेलु महिला कामगार बोर्डाची निर्मितीसाठी व महिलांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी प्रयत्न करणार.

खते, औषधे, बी-बियाणे यांचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न, बोगस खते व बियाणे यावर आळा घालण्याचा प्रयत्न करणार. शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र लवकरात लवकर सांगली येथे सुरू व्हावे, यासाठी प्रयत्न करणार, पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणासाठी अशासकीय संस्था स्थापन करणार. सांगली शहराकरिता रिंगरोडची नितांत गरज आहे, त्यासाठी पाठपुरावा करु, महापुराचे नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक सरकारमध्ये धरणांचे पाणी सोडण्यासाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न करेन.

शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, पिकांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला बाजारपेठ आणि बाजवी भाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार, क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी प्रयत्न करणार, शेतीचे बीजबिल कायमस्वरूपी रद्द करावे यासाठी पाठपुरावा करू. शेतकऱ्यांची प्रलंभित वीज कनेक्शन्स तातडीने जोडण्यासाठी पाठपुरावा करणार. कृषी उत्पादनावर आधारित उद्योग उभारण्यास चालना देणार, कृषी उपकरणे स्वस्त मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज येण्यासाठी अद्यावत हवामान केंद्राची उभारणी करणार, हळद पीक संशोधन केंद्र स्थापनेसाठी प्रयत्न करणार.

शहरात शामरावनगरातील सांडपाण्याच्या वारंवार बीज खंडित होते. त्यासाठी महावितरणला अधिक क्षमतेचे वीज केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव देणार. महापालिका क्षेत्रात नाट्य अकादमी आणि चित्रपटसृष्टी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबविणार,

माथाडी कायद्याची परिपूर्ण अंमलबजावणी करिता माथाडी महिला आणखी सक्षम करणार, त्यांच्यासाठी घरकुल योजना राबविणार, असंघटित कामगारांना पेन्शन योजना, माथाडी रुग्णालय उभा करणार, सांगली बाजारपेठेतील हळद, गुळ व्यापार पुर्ववत सक्षम करण्याकतरिता योग्य त्या उपाययोजना करणार आदि आश्वासने देण्यात आली आहेत.

वसंतदादा मार्केटयार्डमध्ये व्यापा-यांसाठी सुविधा पुरवणार, शेतकरी, व्यापारी, वाहन चालक, ड्रायव्हर यांच्यासाठी राहण्याची सोय व प्रसाधनगृह उभा करणार. वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी तसेच महापालिकेतील हॉस्पिटलसाठी भरीव निधी मिळवून देणार. पद्माळे, कर्नाळ, नांद्रे, नावरसवाडी, कावजी खोतवाडी, बाजेगाव, बिसूर, बुधगाव, माधवनगर, बामणोली, वानलेसवाडी, इनाम धामणी, जुनी धामणी, हरिपूर, अंकली या गावांमध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, आरोग्य यासाठी प्रयत्न करणार.

जाहीरनामा प्रकाशनावेळी प्रवीण निकम, प्रकाश मुळके, राजू निंबाळकर, महेश कर्णे, उदय पाटील, मानसिंग शिंदे, किरण झुंजारराव, शमाकांत आवटी, प्रा. देवानंद जमगे, संजय कांबळे, शितल लोंढे, आनंदा लेंगरे, अमित लाळगे, संजय शिकलगार, शहाजी सरगर, अध्याज मुजावर, जयराज बर्गे, मनोज सरगर, अजित सूर्यवंशी, कय्युम पटवेकर, रत्नाकर नांगरे, प्रशांत पाटील मजलेकर, किशोर शहा, संतोष पाटील, सचिन कदम, धनंजय खांडेकर, मयूर बांगर, अवधूत गवळी, अमोल झांबरे आदि उपस्थित होते.