yuva MAharashtra अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारासाठी क्रिडापटू मैदानात !

अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारासाठी क्रिडापटू मैदानात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ नोव्हेंबर २०२
सांगली येथील क्रीडा संघटना व क्रीडा मंडळाच्या वतीने जयश्री पाटील यांच्या प्रचारात खेळाडूंनी रॅली काढून त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार, छत्रपती पुरस्कार गणेश शेट्टी, स्थानिक खेळाडू अशोक घाडगे, अथलेंकस संजय पाटील, नितीन पाटील, जहांगीर तांबोळी, प्रा. देवानंद जमगे यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

तरुणाईमध्ये असणाऱ्या गुणांना वाव मिळावा, त्यांना आकार मिळावा यासाठी एक स्वतंत्र दालन निर्माण केले जाईल. मिरज येथील जिल्हा क्रीडा केंद्रात अत्याधुनिक उपकरणे आणली जातील. कबड्डी, खो-खो, कुस्ती या खेळांसाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण केल्या जातील. तसेच सांगली येथील सर्वच क्रीडांगणावर आत्याधुनिक सेवा सुविधा उभारल्या जातील, अशी ग्वाही सांगली विधानसभा क्षेत्राच्या महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी दिली.


सांगलीच्या क्रीडा नगरीत स्वर्गीय मदन पाटील यांचे मोठे योगदान आहे. कुस्ती, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, मैदानी खेळ अशा विविध खेळाडूंच्या खेळाडूंनी या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव देशभर प्रसिद्ध केले आहे. अनेक मोठमोठे खेळाडू या क्रीडांगणावर घडले. देशाच्या उज्वल भविष्यासाठी अनेक खेळाडू या मातीत घडतील. त्यांना आकार देण्याचे काम या क्रीडांगणावर होईल. त्यामुळे भविष्यात सर्व सोयी सुविधांनी युक्त असे भव्य क्रीडा दालन सांगली नगरीत उभारण्यात येईल. या क्रीडा रॅलीत खेळाडूंनी सक्रिय भाग घेतला होता. जय मातृभूमी, तरुण भारत, शिवशक्ती, बिसुर व्यायाम मंडळ आदी मंडळांनीही सहभाग घेतला.

यावेळी नितीन पाटील म्हणाले, भाऊंनी महापालिकेत दत्तक योजना चालू केली. विविध संघटनेसाठी मोफत जागा दिली, त्या ठिकाणी व्यायाम शाळा उभारण्यात आल्या, भाऊ कब्बडी प्रेमी होते.