yuva MAharashtra मिरजेतील दुकानाला भीषण आग; मोठ्या प्रमाणावर साहित्य जाऊन खाक, दोन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर नियंत्रण !

मिरजेतील दुकानाला भीषण आग; मोठ्या प्रमाणावर साहित्य जाऊन खाक, दोन तासाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर नियंत्रण !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १२ नोव्हेंबर २०२
मिरजेतील वैरण बाजार येथील दुकानाला भीषण आग लागली. रात्री उशिरा लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान अग्निशमन दलाच्या बंबांनी दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत मोठ्या प्रमाणावर साहित्य जाऊन खाक झाले आहे. मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे. रात्री उशिरापर्यंत परिसरात मोठी गर्दी होती.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मिरजेतील वैरण बाजार येथील एका दुकानाला रात्री उशिरा आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीने कळविण्यात आले. मिरजेसह सांगली आणि कुपवाड येथील तीन बंब मागवण्यात आले.


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांचे सुरू होते. रात्री उशिरा नियंत्रण मिळवण्यात यश आले. मिरज शहरातील मुख्य भागात लागलेल्या आगीमुळे शहरात खळबळ उडाली. बघायची मोठी गर्दी परिसरात होती. महावितरणाच्या कर्मचारी तातडीने धाव घेत वीज पुरवठा खंडित केला.

सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती. अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुनील माळी यांच्यासह पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले.