| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ नोव्हेंबर २०२४
सांगली शहरातील सावंत प्लॉट येथे किरकोळ कारणातून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. शैलेश कृष्णा राऊत असे त्याचे नाव आहे. त्याच्या खून प्रकरणी एका अल्पवयीन संशयितासह सुमित मद्रासी याला पोलिसांनी अटक केली आहे.
मयत शैलेश राऊत आणि मारेकरी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मयत हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. पूर्वी झालेल्या वादावादीतून त्याला समज देण्यासाठी सुमित मद्रासी हा सोबत एका अल्पवयीन तरुणाला घेवून गेला होता. पण यावेळी तिघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यामुळे वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि शैलेश याच्या जवळ असणारा चाकू संशयितांनी हिसकावून घेवून त्याचा निर्घृण खून केला. स्थानिक गुन्हे शाखेने दोघा मारेकर्यांना अटक केली आहे. विश्रामबाग पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.