yuva MAharashtra मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणांतर्गत जिल्ह्यातील ३०८४ तरुणांना रोजगार !

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणांतर्गत जिल्ह्यातील ३०८४ तरुणांना रोजगार !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ नोव्हेंबर २०२
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना' युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळण्यासाठी, तसेच त्यांच्यात रोजगारक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. १८ ते ३५ वर्षांपर्यंतच्या तरुणांच्या हाताला काम लागले. या योजनेसाठी जिल्हातील तब्बल ३०८४ तरुण-तरुणींचा प्रतिसाद मिळाला.

सांगली जिल्ह्यातील शासकीय संस्थांमध्ये १९४३, तर खासगी संस्थांमध्ये ११४१ तरुणांची भरती करण्यात आली. या योजनेंतर्गत अनेक तरुणांच्या हाताला काम लागल्याने राज्यातील तरुण स्वावलंबी जीवन जगत आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ तरुणांना पुढे नोकरी करताना होणार आहे.


या योजनेंतर्गत काम करण्यास पात्र असणारे तरुण व त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेले उद्योजक जोडले गेले. रोजगारास इच्छुक असणाऱ्या तरुणांना कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळाला. प्रशिक्षिणार्थी तरुणांच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत झाली. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्‍यक मनुष्यबळ योजनेमार्फत मिळाले. जिल्ह्यातील अधिकाधिक बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.


युवा प्रशिक्षणार्थींना मिळणारे दरमहा वेतन 

बारावी उत्तीर्ण- सहा हजार
आयटीआय, पदविका उत्तीर्ण- आठ हजार 
पदवीधर, पदव्युत्तर- दहा हजार

अठरा ते पस्तीस वयोगटातील पदवीधर आणि बेरोजगार युवक-युवतींनी या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागांतर्गत राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा. या तरुणांना या अनुभवाचा लाभ होईल. भावी करिअरसाठी या योजनेचा लाभ होईल. तेव्हा अधिकाधिक बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, सांगलीचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.