yuva MAharashtra देवेंद्र फडणवीसांना केंद्रात ऑफर ? ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीत खलबतं !

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात ऑफर ? ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीत खलबतं !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ नोव्हेंबर २०२
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पण हा विजय साधा नाही, तर मोठा विजय आहे. महायुतीसमोर महाविकास आघाडीचा पूर्ण पराभव झाला. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले. तर महायुतीने 230 जाग मिळवत बहुमाताचा आकडा पार केला. त्यानंतर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीतून पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावर सस्पेन्स आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जागा पाहून फडणवीस यांच्य गोटातून मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही देवेंद्र फडणवस यांचे नाव पुढे केले जात आहे. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्रीपद सोडण्यास सहजासहजी मान्य होतीलं असेही वाटत नाही. शिंदे गटाकडूनही मुख्यमंत्रपदाची आग्रही मागणी होऊ लागली आहे.


दरम्यान, महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, ज्याच्या जास्त जागा असतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे अद्याप ठरलेले नाही. याबाबत महायुतीतील तीन घटक पक्षांचे नेते बसून निर्णय घेतील. त्याचवेळी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकत्र बसूनच घेतला जाईल,असं देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते.

RSS For BJP: संघाचा 'हा' मास्टरप्लॅन अन् भाजपचा महाराष्ट्रात ऐतिहासिक रेकॉर्ड; जाणून घ्या अंदर की बात

भाजप : 132
शिवसेना (शिंदे गट): 57
राष्ट्रवादी (अजित गट): 41

निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरच्या दोन्ही संकेतांवरून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीला 220+ जागा मिळाल्या आहेत. एकट्या भाजपने 125 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार हे निश्चित मानले जात आहे. पण एकनाथ शिंदे सहज सहमत होतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणज् भाजपमध्ये फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्रीपदाची मागणी जोर धरू लागली आहे. खुद्द आरएसएसकडूनही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिले जावे, अशी मागणी होताना दिसत आहे. याशिवाय अमित शहा यांनीही नुकत्याच झालेल्या निवडणूक सभेत केलेल्या वक्तव्यातून याचे संकेत दिले होते.

उमेदवार: देवेंद्र फडणवीस (भाजप)
मतदारसंघ: नागपूर दक्षिण पश्चिम
किती मतांनी विजयी: 39,710 हजार मते
उमेदवार: एकनाथ शिंदे (शिवसेना)
मतदारसंघ: कोपरी-पाचपाखाडी
किती मतांनी विजयी झाले: 1,20,717

लाजिरवाणी हार, नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह..; महाराष्ट्रातील पराभवाचे काँग्रेसवर काय परिणाम होणार?

महायुतीने मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप पत्ते उघडलेले नसले तरी. मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, हे निश्चित आहे. पण एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतूनही ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे. पण महाराष्ट्रातील विजयासाठी आपल्या मुलाने 24 तास मेहनत घेतली आहे. त्याच्या खाण्यापिण्याची आणि दैनंदिनीचीही त्याला फिकीर नव्हती. देवेंद्र फडणवीस यांना फक्त मुंबईतच राहायचे आहे, त्यांना दिल्लीला जायचे नाही. अशी प्रतिक्रीया देवेंद्र फडणवीसांच्या आई सरिता फडणवीस यांनी दिली आहे.

अशा स्थितीत भाजपकडेही प्लॅन बी आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल. एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पद घेऊन डिमोशन स्वीकारणार नाहीत. तोच फडणवीसांनाही आता मंत्रिमंडळात इतर हलकी पद घेण्याची इच्छा नाही. असा परिस्थितीत केंद्रीय नेतृत्त्वाकडून देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते किंवा एकनाथ शिंदेदेखील नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, असेही सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे 2019 च्या घटनेची पुनरावृत्ती करतील, अशी शक्यता फारच कमी आहे. 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. उद्धव यांची अवस्था त्यांनी पाहिली आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंची पुनरावृत्ती करण्याऐवजी ते दिल्लीत जाण्याचा पर्याय निवडू शकतात, असेही सांगितले जात आहे.