yuva MAharashtra काँग्रेस सेवा दलातर्फे सरदार वल्लभभाई पटेल व श्रीमती इंदिरा गांधी यांना अभिवादन !

काँग्रेस सेवा दलातर्फे सरदार वल्लभभाई पटेल व श्रीमती इंदिरा गांधी यांना अभिवादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ नोव्हेंबर २०२
सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने भारताचे पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगली जिल्हा काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्यात आले.

प्रारंभी माझी तहसीलदार विवेक अंकलीकर माननीय सुनील भिसे सौ प्रतिक्षा काळे काँग्रेसचे ज्येष्ठ अशोक रावजी मालवणकर यांच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल व प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी स्वागत प्रास्ताविक प्रदेश सेवा दलाचे संघटक पैगंबर शेख यांनी केले व शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मांडले.


यावेळी पैगंबर शेख सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्षअनिल मोहिते अशोकराव मालवणकर विवेक अंकलीकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिराजी गांधी यांच्या विषयी त्यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश माने विश्वास यादव, रामसिंग परदेशी, प्रमोद आवळे, सुरेश गायकवाड यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.