yuva MAharashtra आकाशवाणीमागील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सात लाखांचे दागिने केले लंपास !

आकाशवाणीमागील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सात लाखांचे दागिने केले लंपास !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ नोव्हेंबर २०२
शहरातील कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्रानाजिकच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने १२ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पावणे दोन लाख रूपये असा सुमारे ७ लाखाचा ऐवज चोरून पोबारा केला. याबाबत शिवाजी संपतराव कदम (वय ४५, रा. सावर्डेकर प्लॉट, सुभाषनगर, आकाशवाणीमागे) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिवाजी कदम यांचे टायर्सचे दुकान आहे. शनिवारी, दि. २ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कदम कुटुंबिय अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथे मूळ गावी दिवाळी यात्रेनिमित्त गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. चोरट्याने बंद घर हेरून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममध्ये लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांना थेट हात घातला. चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या, सोन्याचा नेकलेस, कानातील झुबे, सोन्याची अंगठी, तीन घड्याळे, चांदीची मूर्ती आणि रोख पावणे दोन लाख रूपये असा सुमारे ७ लाख रूपयांचा ऐवज घेऊन चोरट्याने पलायन केले.


गावी गेलेले कदम कुटुंबिय दि. ३ रोजी सायंकाळी सव्वा सात वाजता घरी परतले. तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे येथील मंगल अधिकराव माळी यांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. दिवाळीमुळे त्यांची पत्नी, मुलगा हे मूळ गावी नांद्रे (ता. मिरज) येथे गेले होते. रविवारी ३ रोजी सायंकाळी पाटील हेही घराला कुलुप लावून नांद्रे गावी गेले. यावेळी चोरट्याने त्यांच्याही घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करून बेडरूमच्या कपाटातील ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. सोमवारी दुपारी ते घरी परतल्यानंतर घराला लावलेले कुलुप दिसून आले नाही. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.