| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ नोव्हेंबर २०२४
कोल्हापूर शहराचा काँग्रेस पक्षाचा जाहीर झालेले उमेदवार लाटकर यांची उमेदवारी बदलण्यात आली. कारण सर्व्हेच्था रिपोर्टमध्ये त्यांचा पराभव दिसून येऊ लागला. त्यामुळे लाटकर यांची उमेदवारी बदलून त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्याच पद्धतीने सांगली विधानसभेसाठी उमेदवारी काँग्रेस पक्षाची ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली आह, ते उमेदवार बदलून काँग्रेस पक्षाचा पाठिंबा श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांना देण्यात यावा, मागणी सामाजिक कार्यकर्ते, केले प्रवक्ते संतोष पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराची हॅट्रिक रोखण्याचे काम श्रीमती जयश्री वहिनीच करू शकतील, असे सांगलीतील सर्व्हे रिपोर्टनुसार माहिती मिळाली आहे. त्यामुळे येत्या चार तारखेला काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवार बदलून त्या ठिकाणी श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा द्यावा, असे संतोष पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे.
जनाधार असणारा उमेदवार सांगली 282 विधानसभेत असणे गरजेचे आहे व हा जनाधार श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे असं एकंदरीत दिसत आहे. त्यामुळे श्रीमती जयश्री वहिनीच यांना काँग्रेस पक्षाने व वरिष्ठ नेत्याने विचार करून त्यांना पाठिंबा द्यावा,अन्यथा या ठिकाणी लोकसभेप्रमाणे सांगली पॅटर्नचा उदय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.असेही संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.