| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ नोव्हेंबर २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना आज डॉ. आण्णा भाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र राज्य यांचा जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस आकाश तानाजी कांबळे म्हणाले, 'स्व. गुलाबराव पाटील यांच्या प्रमाणेच पृथ्वीराजबाबा हे कायम लक्षात शिव, शाहू, फुले, आंबेडकर, आण्णाभाऊ यांचा समतेचा व संविधान संरक्षणाचा विचार जगणारे आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघातील जनतेत पृथ्वीराजबाबा यांच्याविषयी कमालीचा आदर असून ते आमदार झाल्यावर सांगलीचा हमखास चौफेर विकास करणार ही आम्हाला खात्री आहे त्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'संविधानाचे रक्षण, धर्मनिरपेक्षता आणि तळागाळातील लोकांचे कल्याण ही काँग्रेस पक्षाची विचारधाराच महाराष्ट्र सुरक्षित आणि निर्भय करु शकते. छ. शिवाजी महाराज, मी. जोतिबा फुले, छ. , शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुरोगामी विचारांने वाटचाल करताना आपण सर्व माझ्या पाठीशी राहिलात. आपली शक्ती ही माझी खरी ताकद आहे. सर्वांच्या कल्याणासाठी मी कार्यरत राहीन. '
पाठिंबा पत्र देताना जिल्हाध्यक्ष तुषार ठोंबरे, राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे, सरचिटणीस आकाश तानाजी कांबळे, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विक्रम दाजी कांबळे, पुरोगामी विचारवंतप्रा. एन.डी.बिरनाळे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, व्हीजेएनटी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत देशमुख, माजी नगरसेविका भारती भगत, रज्जाक नाईक, काँग्रेस परिवहन जिल्हाध्यक्ष मनोज लांडगे, ए. डी. पाटील उपस्थित होते.