| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ नोव्हेंबर २०२४
विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर काही उमेदवारांची ही दुसरी तिसरी, चौथी, वेळ असणार आहे. सन १९५७ ते १९६२ या कालावधीत पहिली विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आताच्या चौदाव्या विधानसभे पर्यंत म्हणजे गेल्या ६७ वर्षांत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहात सहभाग घेण्याची संधी आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदारांना मिळालेली आहे. भारतात सर्व नागरिकांसोबतच मतदार म्हणून महिला मतदारांना ही मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र आपल्याला विनासायस मिळालेल्या मतदानाच्या या अधिकारासाठी जगातील किती तरी देशांतील महिलांना प्रदिर्घ लढा द्यावा लागलेला आहे. ब्रिटन, अमेरीका, व इतर अनेक देशांत महिला मतदारांना आपल्या मतदानाच्या अधिकारासाठी
महिला मतदारांची संख्या
सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन २०१५ साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे ९२५ इतकेहोते. हे प्रमाण वाढवण्याकरिता महिला मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे २०२४ मध्ये या प्रभागात ९३६ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नींदगी झाली आहे. त्यामध्ये पुरुष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६२ लाख ९६ हजार २७९ इतकी झाली आहे. महामने एकूण मतदारांच्या संख्येच्या प्रभावात महिला मतदारांचा टका हा जवळपास पनास टक्के इतका आहे. राज्यात विविध जिल्हयात महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारां इतकी काही ठिकाणी त्या पेक्षा जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
आतापर्यंतच्या महिला आमदारांचे संख्याबळ
समाजाची अर्धी लोकसंख्या, महिला वर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्याच समुहातील महिला निवडून जाण्याचे प्रमाण हे विधानसभेच्या स्थापनेपासून बदलत असल्याचे बधायला मिळते. २० नोव्हेंबर रोजी मतदान होत होऊन अस्तित्वात येणारी ही विधानसभेची पंधरावी विधानसभा असणार आहे. त्यापूर्वीची म्हणजेच दि.२७ नोव्हेंबर रोजी कार्यकाळ संफणा-या चौदाव्या विधानसभेत एकूण आमदार महिलांची संख्या २० इतकी होती. महाराष्ट्राची पहिली विधानसमा सन १९५७ ते १९६२ या कालावधीत अस्तित्वात आली. या महाराष्ट्राच्या पहिल्यावहील्या विधानसभेच्या सभागृहात संधी मिळालेल्या एकूण महिला आमदारांची उपस्थिती लक्षणीय अशी म्हणजे तीस इतकी होती तर त्याच्या पुढच्या कार्यकाळातील म्हणजे सन १९६२ ते ६७ या कालावधीतील दुस-या विधानसमेत १७ महिला आमदारांना सभागृहात पोहचण्याची संधी मिळाली होती. आणि १९६७ ते १९७२ या तिस-या विधानसभेत १२ महिला आमदार निवडून आलेल्या होत्या. चौध्या १९७२७८ या कार्यकाळातील विधानसमेत २८ महिला आमदारांनी सभागृहात हजेरी लावली तर १९७८-८० या कालावधीत कार्यरत पाचव्या विधानसभेत ८ महिला आनदार होत्या. १९८०-८५ या काळातील सहाव्या विधानसमेत २० तर त्याच्या नंतर अस्तित्वात आलेल्या १९८५-१९९० वा कालावधीतील सातव्या विधानसमेत १६ आणि सन १९९०-९५ मध्ये कार्यरत आठव्या विधानसमेत महिला आमदार होत्या, तर नवव्या विधानसमेत म्हणजेच १९९५-९९ या काळात १४ महिला आमदार निवडून आल्या. सन १९९९ २००४ या काळात अस्तित्वात आलेल्या दहाव्या विधानसमेत १३ महिला आमदार तर अकराव्या विधानसभेत २००४- २००९ या कालावधीत बारा महिला मतदार विधानसभेच्या सभागृहात होत्या. २००९-२०१४ या कार्यकाळात अस्तित्यात आलेल्या बाराव्या विधानसभेत १३ महिला आमदार, तर सन २०१४- २०१९ मधील तेराव्या लोकसभेत २२ आणि सन २०१९- २०२४ या चौदाव्या विधानसमेत २७ महिला आमदारांनी जनतेच्या प्रश्नांची मांडणी केली.
सर्व महिला आमदारांमध्ये पहिल्या विधानसभेतील एकूण महिला आमदारांमध्ये पाच महिला आमदार या अपक्ष होत्या. तर त्यानंतरच्या कुठल्याच विधानसभेत अपक्ष महिला आमदार नव्हत्या. त्यानंतरच्या १४ व्या विधानसभेत २ अपक्ष महिला आमदार राहिल्या एकंदरीत विधानसमेत राजकीय पक्षाच्याच महिला आमदार प्रतिनिधी यांचे प्रमाण सातत्याने पाहायला मिळत आहे. पहिल्या विधानसभेत आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला आमदार आतापर्यंत स्थापन झालेल्या विधानसभेच्या कार्यकाळात पहिल्या विधानसभेत तीस इतक्या भरघोस संख्यने महिला आमदार सभागृहात होत्या. त्यानंतरच्या कुठल्याच विधानसभेत इतक्या मोठ्या संख्येने महिला आमदार राहीलेल्या नाहीत. त्याच्या खालोखाल १९७२-७८ या कार्यकाळातील चौथ्या विधानसभेत २८ तर आणि सन २०१५-२०२४ मध्ये चौदाव्या विधानसभेत २७ इतक्या महिला आमदारांची संख्या बधायला मिळाली आतापर्यंतच्या चौदा विधानसभांच्या कार्यकाळात सर्वात कमी महिला आमदार या सन १९९०- ९५ मध्ये कार्यरत आठव्या विधानसभेत ६ तर १९७८-८० या कालावधीत कार्यरत पाचव्या विधानसभेत केवळ ८ महिला आमदार होत्या म्हणजेच पहिल्या विधानसभेच्या १९५७ ते १९६२ या साली महिला आमदारांची संख्या ही सर्वात जास्त राहिलेली आहे. महिला आमदारांचे प्रमाण वाढत असल्याचे आश्वासक चित्र पुढच्या विधानसभेच्या कार्यकाळात बधायला मिळत नाहीये तर सातत्याने हे प्रमाण तीसच्या आत राहिलेले असून त्यात चढउतार झालेले दिसले.
महिला मतदारांचा मतदानातील सहभाग
सन २०१४ विधानसभा निवडणुकीतील महिला मतदान टक्केवारी ६१.६९ एवढी होती. २०१९मध्ये महिला मतदारांची संख्या ४,२७,०५,७७७ एवढी होती. सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण मतदान टक्केवारी ६१.१ होती, तर महिला मतदानाची टक्केवारी ५९.२६ आणि पुरुष मतदानाची टक्केवारी ६२.७७ टक्के एवढी राहीली. म्हणजे महिला मतदानाध्या टक्केवारी पेक्षा साडे तीन टक्के पुरुष मतदान जास्त होते. मात्र विधानसभेत महिला आमदारांचा टका हा पुरुष आमदारांच्या तुलनेत अत्यंत कमी राहीलेला आहे. या वर्षी किती महिला आनदारांना आपला आवाज सभागृहात मांडग्याची संधी मिळणार आहे हे पेत्या २३ नोव्हेंबरला म्हणजे या निवडणूकीच्या मतदानानंतर आपल्याला समजेलच, महिला आमदारांच्या निवडून येण्याचे प्रमाण वाढवण्यात महिला मतदारांचे शंभरटक्के मतदान करण्याचे प्रमाण निश्चितष परिणामकारक ठरेल.
(संदर्भ- विधीमंडळ ग्रंथालयाच्या सौजन्याने)
वंदना रघुनाथराव थोरात,
विभागीय संपर्क अधिकारी