yuva MAharashtra आ. डॉ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील यांची शिष्टाई दुसऱ्यांदा निष्फळ, जयश्रीताई बंडखोरीवर ठाम !

आ. डॉ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील यांची शिष्टाई दुसऱ्यांदा निष्फळ, जयश्रीताई बंडखोरीवर ठाम !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ नोव्हेंबर २०२
सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा धडा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतरही कायम राहिला आहे. मध्यंतरी आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनीही श्रीमती जयश्रीताई पाटील यांचे समजूत घालून, बंडखोरी मागे घेण्याबाबत प्रयत्न केले होते. काल पुन्हा एकदा या दोघा नेत्यांनी श्रीमती जयश्रीताई पाटील यांची भेट घेऊन शिष्टाई करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी आहे. 

काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सांगली जिल्हा परिषदेसमोरील विष्णू अण्णा भवन येथे श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी भावुक झालेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, 'मी पळणारी नाही तर लढावी बाई आहे, गेले नऊ वर्षे आपण साऱ्यांनी स्व. मदन भाऊ पाटील यांच्या निधनानंतर मला साथ दिली आहे. मी सुद्धा माझ्या परीने तुम्हा साऱ्यांना जितके देण्याचा प्रयत्न करता येईल तितका तो केला आहे. आता लढाई निकराची आहे. आपण माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ करेन.' आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने जयश्री ताई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. 

गतसप्ताहात श्रीमती जयश्रीताई पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी प्रचारासाठी रणशिंग फुंकले आहे. शहराच्या विविध भागात त्यांनी आपल्या समर्थकांसह नागरिकांची संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या बंडखोरीचा काँग्रेसलाच फटका बसणार असल्याने पक्षातर्फे जयश्रीताईंचे समजूत घालण्याचा अजूनही प्रयत्न सुरू आहेत. आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी खा. विशाल पाटील यांच्या समवेत पुन्हा एकदा बंद दाराआड केलेली चर्चा निष्फळ ठरली आहे.

श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या बंडखोरीचा थेट फायदा भाजपला अर्थात सुधीरदादा गाडगीळ यांना होणार आहे. विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा बंडखोरीमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला धोका निर्माण झाला आहे. ही बाब आ. डॉ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी श्रीमती जयश्रीताई पाटील यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही श्रीमती जयश्रीताई पाटील या आपल्या बंडखोरीवर ठाम आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अद्यापही दोन दिवसांचा कालावधी असून, या दरम्यान श्रीमती जयश्रीताई पाटील यांची समजूत घालण्यात काँग्रेसच्या नेत्यांना यश येते, की येथे श्रीमती जयश्री ताईंचे बंडखोरी कायम राहते, यावर श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या विजयातील अडचण दूर होतो की, त्यांच्या मार्गातील अडचणीत वाढ होते हे लक्षात येईल.