yuva MAharashtra सुधीरदादांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू शिवाजी डोंगरे यांची माधवनगरमध्ये प्रचारप्रसंगी जाहीर ग्वाही !

सुधीरदादांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू शिवाजी डोंगरे यांची माधवनगरमध्ये प्रचारप्रसंगी जाहीर ग्वाही !


| सांगली समाचार वृत्त |
माधवनगर - दि. ११ नोव्हेंबर २०२
सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करू. माधवनगर आणि परिसरातून त्यांना विक्रमी मताधिक्य देऊ, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी दिली. आमदार गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आज माधवनगरमध्ये कार्यक्रम झाला. प्रचारफेरी निघाली. त्यावेळी डोंगरे यांनी आमदार गाडगीळ यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी डोंगरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवाजी डोंगरे म्हणाले, सुधीरदादा गाडगीळ यांनी या मतदारसंघात गेल्या दहा वर्षात अनेक विकास कामे केली आहेत. माधवनगर आणि परिसराचा विकासही दादांच्यामुळे झालेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह सुधीर दादांना पूर्ण पाठिंबा देत आहे. त्यांना या परिसरातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळावे याकरता संपूर्ण नियोजन यापुढे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केले जाईल. माझा उमेदवारी अर्ज, त्यानंतरची माघार या सर्व घटनांवर आता पडदा पडला आहे. मी भारतीय जनता पक्षाचेच काम आजपर्यंत निष्ठेने केले आहे आणि यापुढेही करणार आहे. सुधीरदादांच्या प्रचारात पूर्णपणे सक्रिय राहणार आहे.


आमदार गाडगीळ म्हणाले, शिवाजी डोंगरे यांनी घेतलेला हा निर्णय भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीला बळकटी देणारा आहे. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे. यापुढे सर्वजण एक दिलाने काम करून या मतदारसंघाचा आणखी विकास घडवून आणू.

यावेळी माधवनगरचे माजी सरपंच उपसरपंच सचिन पाटील, देवराज बागल, किरण भोसले, अतुल माने तसेच तसेच भारतीय जनता पक्षाचे आणि डोंगरे यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.