| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ नोव्हेंबर २०२४
सांगलीच्या वसंतनगर मध्ये आज पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या प्रचारार्थ महिलांची घरगुती बैठक संपन्न झाली. यावेळी विजया पाटील, ज्योती आदाटे व नूतन पवार यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. ते मार्गदर्शन करताना म्हणाले , 'पृथ्वीराज पाटील हा कामाचा व हक्काचा माणूस आहे. महापुरात अनेकांचे संसार वाचवले. कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवण्यासाठी औषधे व उपचार उपलब्ध करून अहोरात्र कष्ट घेतले. सांगलीकरांना कोरोना लसींचा पुरेसा कोटा मंजूर करुन आणला.
पृथ्वीराज पाटील काँग्रेस पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या हात चिन्हावर मतदान करणे म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाला, त्यागाला सॅल्युट करणे होय. काँग्रेसने देश स्वतंत्र केला. असंख्य काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपले संसार उध्वस्त करुन घेतले म्हणून देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती अशा कठिण काळात पंडित नेहरु यांनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि देशाचा चौफेर विकास घडवून आणला. अनेक धरणं बांधली त्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. वीज निर्मिती प्रकल्प झाले. देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवले. महामार्ग, शाळा, काॅलेजीस, दवाखाने, रेल्वे, विमानसेवा, वैज्ञानिक प्रगती. हे सारं काँग्रेसमुळे झाले.
भाजपा केवळ जातीपातीच्या नावावर भांडणं लावून राज्य करते. राज्यातील महायुती शासन अपयशी ठरले आहे. संविधान धोक्यात आले आहे. ते वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या हाताला मतदान करुन पृथ्वीराज पाटील यांना निवडून आणण्यासाठी वसंतनगर भागातील महिला पुढे सरसावल्याचे स्पष्ट झाले आहे. वसंतनगर मधील महिलांनी पृथ्वीराज पाटील यांच्या हात चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा एल्गार केला. त्याबद्दल सर्व महिलांना धन्यवाद देते असे विजया पाटील म्हणाल्या. ज्योती आदाटे म्हणाल्या, 'या भागात रस्ते व्यवस्थित नाहीत. गटारी नाहीत. महापालिका भूखंड विकास नाही. पावसाळ्यात पाणी साचून दलदल निर्माण होऊन डासांची उत्पत्ती होते. लोकांचे आरोग्य धोक्यात येते. आमदार दहा वर्षात कधी या भागात एकदाही आले नाहीत अशी खंत व्यक्त केली.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांना निवडून देणार, त्यांचा या भागात कायम संपर्क असतो. त्यांना इथल्या समस्या माहित आहेत. ते नक्की पाच वर्षांत इथल्या समस्या सोडवून वसंतनगर स्मार्ट नगर करतील असा विश्वासही महिला व्यक्त करताना दिसून आल्या . यावेळी झालेली महिलांची गर्दी पृथ्वीराज पाटील यांच्या विजयाला पुष्टी देणारी होती.
या घरगुती बैठकीत विजया पाटील गौस नदाफ, रमेश पाटील, रोहन खुटाळे, माजी नगरसेवक किरण सुर्यवंशी, ज्योती आदाटे, नूतन पवार, महादेव व मलगोंडा पाटील, मनोज, निखिल व तन्मय पाटील, मुन्ना पखाली, जावेद पिंपरी व परिसरातील महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.