yuva MAharashtra महापालिका क्षेत्रातील स्वच्छता पूर्ण क्षमतेने करण्यासाठी आरोग्य विभागाकडील बदल्या होणार - शुभम गुप्ता आयुक्त

महापालिका क्षेत्रातील स्वच्छता पूर्ण क्षमतेने करण्यासाठी आरोग्य विभागाकडील बदल्या होणार - शुभम गुप्ता आयुक्त


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ नोव्हेंबर २०२
सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा आढावा माननीय आयुक्त यांनी घेतला आहे.

प्रत्येक वार्ड निहाय स्वच्छता साठीं शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्त करण्यात येणार आहे. स्वच्छता हा मुख्य उद्देश असून यासाठी वार्ड निहाय कर्मचारीच्या मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत. रस्ते आणि गटारी यांची स्वच्छता करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करून कर्मचारी समान प्रमाणामध्ये वाटप करून करण्यात येणार आहे.

स्वच्छतेबाबत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले असून त्यासाठी कर्मचारी यांच्या मोठ्या प्रमाणांत बदल्या होणार आहेत. सर्व कर्मचारी यांना गणवेश हा सक्तीचा असणार आहे. वेगवेगळ्या रंगांमधील गणवेश असणार आहेत.


कायम कर्मचारी बदली कर्मचारी व मानधन कर्मचारी यांचे समान वार्डनिहाय वाटप करण्यात येणार असून, ज्या वार्डामध्ये मनुष्यबळाचे जास्त आवश्यकता आहे त्याबाबत वेगळा विचार करण्यात येणार असून तशी नियुक्ती देखील करण्यात येणार आहे. आठवडी बाजार सण उत्सव याबाबत देखील विचार करण्यात येणार आहे.

 शहरातील स्वच्छता चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी बदल्या व नियोजन याच्यात समन्वय साधून चांगल्या पद्धतीने महापालिकेतील स्वच्छता करण्यात येणार आहे. मनपा कामकाजात गतिमान करण्यासाठी सर्व विभागनिहाय बदल्या तातडीने करण्यात येणार आहेत. मा शुभम गुप्ता ,आयुक्त यांनी यांनी विविध विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्या कामकाज बाबत माहिती घेऊन येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्या बदल्या होणार आहेत असे संकेत दिले आहेत.