yuva MAharashtra व्यापा-यांच्या पाठबळावर सांगलीची व्यापारपेठ आणखी समृद्ध करु - आ. सुधीरदादा गाडगीळ

व्यापा-यांच्या पाठबळावर सांगलीची व्यापारपेठ आणखी समृद्ध करु - आ. सुधीरदादा गाडगीळ



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ नोव्हेंबर २०२
सांगली शहरासह माझ्या मतदारसंघातील सर्व व्यापाऱ्यांनी मला सातत्याने पाठिंबा आणि पाठबळ दिले आहे. त्या बळावरच सांगलीची बाजारपेठ आणखी समृद्ध करू, असे प्रतिपादन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.

येथील कापड पेठेमध्ये व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचार बैठक झाली. फटाक्यांच्या आतषबाजीत सुधीरदादांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सुरुवातीस त्यांनी श्री बालाजी मंदिरात दर्शन घेतले.

यावेळी बोलताना रवींद्र बिनीवाले म्हणाले, सुधीरदादा यांनी सांगलीसाठी प्रचंड निधी आणलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की यावेळी त्यांना पूर्वर्वीपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी करायचे आहे.

आपले मनोगत व्यक्त करताना गुरुनाथ कुलकर्णी म्हणाले, सुधीरदादा यांनी सांगलीत अनेक विकासकामे केली आहेत. तसेच वेळोवेळी व्यापाऱ्यांना मदत केली आहे. त्यामुळे सुधीरदादा यांना बहुमताने निवडून आणायचे असा निर्णय आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने घेतला आहे.


नितीन खडीलकर म्हणाले की सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व कसे प्रगट होते ते सुधीरदादांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. त्यामुळे सर्व सांगलीकरांनी आपला माणूस म्हणून सुधीरदादा यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे.

यावेळी श्रीगोपाळ सारडा, मनोज भिडे, नितीन खाडीलकर, श्यामसुंदर सारडा, कुंभोजकर, रमेश गंगवानी, शैलेश केळकर, अमृत पतंगे, राजाभाऊ पडसलगीकर, श्रीराम पडियार, अमित मालाणी, रवींद्र जाखोटिया, बापूसाहेब गोरे, पंढरीनाथ कुलकर्णी तसेच सर्व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.