yuva MAharashtra सांगलीत वसंतदादांचा विचार वारसा पृथ्वीराजच पुढे नेत आहेत - आमदार डॉ. अमित देशमुख

सांगलीत वसंतदादांचा विचार वारसा पृथ्वीराजच पुढे नेत आहेत - आमदार डॉ. अमित देशमुख


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ नोव्हेंबर २०२
महायुती शासनाचा पायाच भ्रष्टाचार हाच आहे. आमदार फोडणे, पक्ष व चिन्ह चोरुन अनैतिक मार्गाने सत्ता बळकावणे हेच काम महायुतीने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र कलंकीत झाला आहे. महायुतीची जाती धर्मात तेढ निर्माण करुन फोडा व झोडा ही दुष्ट प्रवृत्ती महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यात शिक्षण, आरोग्य, व्यापार उद्योग, कृषी, महिला, सामाजिक न्याय इ. बाबीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सामान्य माणसाला महाविकास आघाडी भावली आहे. तीच सत्तेवर येणार. सांगलीत वसंतदादांचा विचार वारसा पृथ्वीराजच पुढे नेत आहेत. निवडणूक ही केवळ निवडणूक नाही तर ती स्वाभिमानाची वैचारिक लढाई आहे. सांगलीचा कोणताही प्रश्न असो पृथ्वीराज प्रामाणिकपणे राबतात. सांगलीसाठी ५०० बेडचे हॉस्पिटल मी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना पहिल्यांदा पृथ्वीराज पाटील यांनी मागितले व २३३ कोटीचा निधीही मंजूर केला लोकसभेप्रमाणे विधानसभेला यश मिळणार आहे. २३ नोव्हेंबरला पृथ्वीराज पाटील आमदार होणार आणि २५ नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करणार. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ. अमित देशमुख यांनी केले. ते सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

यावेळी बोलताना डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, सांगलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची क्षमता ही पृथ्वीराज पाटील यांच्याकडेच आहे. राज्यात ते सध्या आघाडीवर आहेत असा अहवाल आहे. २० नोव्हेंबरला हात चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. सांगलीला काहीही कमी पडू देणार नाही, असे आवाहनही डॉ. देशमुख यांनी यावेळी केले.


यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, माझी लढाई भाजपबरोबर आहे. अपक्षाला मत म्हणजे भाजपाला मदत करण्यासारखे आहे. पाच वर्षे राबलो आता आपल्या सेवेसाठी सांगलीच्या विकासासाठी पाच वर्षे मागतोय. ही निवडणूक तिरंगी नाही. दुरंगी लढत होणार आहे. कार्यशून्य भाजपा आमदार विरुद्ध पाच वर्षे राबवलेला पृथ्वीराज पाटील असे लोक म्हणतात. अपक्ष उमेदवारी लोकांना पसंद पडली नाही. लोक नाराज आहेत. सांगलीतील २० वर्षाचा आमदाराचा बॅकलॉग भरुन काढण्याची संधी मिळाली आहे. कोरोना काळात ५०० बेडचे हॉस्पिटल मंजूर करुन आणले परंतु याचे श्रेय मला मिळेल म्हणून गेली अडीच वर्षे ते विद्यमान आमदारांनी होऊच दिले नाही, हे सांगलीचे दुर्दैव आहे. पृथ्वीराज पाटील यांनी यांनी बोलताना केला.

महाविकास सरकार येणार आणि या हॉस्पिटलचे भूमीपूजन आमदार अमित देशमुखच करणार त्यावेळी मी आपण केलेला आमदार उपस्थित राहणार. असे सांगून पृथ्वीराज पाटील पुढे म्हणाले की, भाजपा सांप्रदायिक सद्भावना नष्ट करत आहे. फोडा आणि राज्य करा ही त्यांची कुनीती आहे. डॉ. विश्वजीत कदम हा वाघ माझ्याकडे आहे, त्यामुळे सांगलीत माझा कोणीही पराभव करु शकत नाही. ठेकेदाराची घरे भरुन टक्केवारीचा हैदोस घालणाऱ्या भाजपाच्या विद्यमान आमदारांना मतदारच त्यांना घरी बसवणार आहेत. असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपाच्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या अध्यक्षा अलका एडके यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला. तानाजी व्हनमाने यांनी पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.