| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ नोव्हेंबर २०२४
मा.संदीप भ. घुगे पोलीस अधीक्षक सांगली व रितु खोखर अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी सांगली यांच्या आदेशान्वये तसेच विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली, प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज, सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी तासगांव व दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक (गृह) तथा सहाय्यक नोडल अधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अंतर्गत सांगली जिल्हयामधील एकुण ०८ विधानसभा मतदार संघामध्ये निवडणुक प्रक्रिया सुरु असुन निवडणुकीचे अनुषंगाने लागु असलेल्या आदर्श आचारसंहितेस बाथा येवु नये तसेच कोणताही अनुचित प्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता सांगली जिल्हा पोलीस दल तत्पर व सतर्कतेने कार्य करीत आहे. त्याप्रमाणे जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ चे अनुषंगाने सांगली जिल्हयामधील एकुण ०८ विधानसभा मतदार संघामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये (उदा. मतदार यांना पैसे वाटप करणे तसेच कोणत्याही आक्षेपार्ह वस्तुचे वाटप करणे, प्रलोभणे दाखविणे, गुन्हेगारी कृत्यांना वेळीच आळा घालणे, संवेदनशिल भागातील हालचाली, घडामोडी वेळीच लक्षात येण्याकरीता खबरदारी म्हणून सातत्याने विविध ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस दलाकडील शासकीय ड्रोन कॅमेऱ्याव्दारे करडीनजर ठेवण्यात येत आहे. सदर ड्रोन कॅमेऱ्याची चित्रीकरणाची क्षमता हि किमान ०३ कि.मी अंतरापर्यंतची आहे त्यामुळे जवळजवळ संपुर्ण शहरावरती ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.
त्यानुसार आज दि. १८/११/२०२४ रोजी २८२-सांगली मतदार संघामधील सांगली शहरातील वडर कॉलनी, शामराव नगर, एसटी स्टॅन्ड परिसर या भागात, २८१-मिरज मतदार संघामधील मिरज शहरातील अमननगर, समतानगर, इंदीरानगर, भारतनगर या भागात तसेच २८७-तासगांव कवठेमहांकाळ मतदार संघातीत तासगांव शहरामध्ये सोमवार पेठ, मोमीन मोहल्ला या ठिकाणी शासकीय ड्रोन कॅमेऱ्याव्दारे करडीनजर ठेवण्यात आली आहे. तसेच सदर वेळी संबधीत पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक पठाण सायबर पोलीस ठाणे, पोहेकों मुजावर जिल्हा विशेष शाखा, सांगली व इतर स्टाफ असे हजर होते.