yuva MAharashtra दृष्टीभ्रम... दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं !...

दृष्टीभ्रम... दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं !...


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ नोव्हेंबर २०२
आपण एखाद्या गावाला जात असताना समोरच्या रस्त्यावर... थोड्या दूरवर आपल्याला पाणी हलत असल्याचा भास होतो. विशेषतः वाळवंटात असे प्रकार हमखास दिसतात... यालाच मृगजळ असे म्हटले जाते. दैनंदिन वापरात 'दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं' असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे. 

आता वरील चित्राचेच पहा ना... वर वर पाहतात आपल्याला असे वाटेल की एखादी व्यक्ती पाण्यात बसून कोणत्यातरी पुस्तकाचे वाचन करीत आहे. परंतु थोडेसे लक्ष देऊन पाहिले तर समजेल की ही कुणी पुस्तक वाचणारी व्यक्ती नसून, पाण्यात तशा प्रकारे रचना केलेले दगड आहेत...

बऱ्याचदा आपण समोरच्या व्यक्ती बाबत असाच ऐकीव गोष्टीवरून भ्रम करून घेत असतो... समोरची ती व्यक्ती आपल्याशी कितीही चांगल्या प्रकारे वागली तरी, आपल्या मनात त्याच्याबाबत असलेला पूर्वग्रह आपल्याला त्याच्याबद्दलचे खरे मत बनवण्यापासून रोखत असतो. आणि मग कदाचित ही व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्यातील गुण आपल्या लक्षात येतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.


आपल्याला एखाद्या व्यक्तीची मदत हवी असते. परंतु त्या व्यक्तीबाबत आपण कुणाकडून तरी चुकीचे ऐकलेले असते. म्हणून मग आपण त्याच्याकडे मदतीसाठी जाण्याचे टाळतो. कदाचित आपले हे वागणे चुकीचे आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. आणि मिळू शकणाऱ्या मदतीपासून आपण वंचित राहतो.

म्हणूनच कुठेही गोष्ट असो अथवा व्यक्ती... त्याबाबत कुठलेही मत बनवण्यापूर्वी, त्याच्याबाबत सर्व काही जाणून, समजून घेतले तर आपल्या पाठीशी एक मोठी शक्ती पुढे राहू शकते. होणारे संभाव्य नुकसान टळू शकते. संकटाच्या काळी तीच व्यक्ती आपल्या पाठीशी ढाल बनवून उभे राहू शकते. 

एखाद्या ठिकाणाहून धूर निघत असेल तर तिथे आग असेलच असे नाही. कदाचित आग दुसऱ्याच ठिकाणी असू शकते. दृष्टीभ्रमामुळे आपल्याला दिसणारा धूर आपली फसवणूक करू शकतो म्हणूनच, परमेश्वराने निर्माण केलेली आपल्या शरीराची रचना लक्षात घेतली तर, "कान आणि डोळे यामध्ये एक वीताचे अंतर आहे" असे म्हटले जाते, ते याचसाठी... कुठल्याही गोष्टीवर ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा डोळ्यावर, अर्थात जे पहाल ते खात्री करून घेऊनच त्यावर विश्वास ठेवावा असे म्हटले जाते...