| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ नोव्हेंबर २०२४
सांगली विधानसभा मतदार संघामध्ये युवक, महिला, जेष्ठ नागरिक, बारा बलुतेदार - अठरा पगड कष्टकरी सामान्य व बहुजन वर्गाचे नेतृत्व करणारा पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारांचा सांगली विधानसभा क्षेत्रासाठी पृथ्वीराज पाटील हा सर्वोत्तम पर्याय आहे हा जनतेचा विश्वास पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सांगलीकरांच्या निरपेक्ष लोकसेवेतून सार्थ ठरवला आहे.
सहकार तपस्वी माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील आणि माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या नावाचं एक अजरामर पर्व सांगलीनं अनुभवलं आहे.
लोकनेते स्व. गुलाबराव पाटील यांनी सांगलीचा नगराध्यक्ष ते राज्यसभेचा खासदार म्हणून केलेली भरीव कामगिरी आणि सहकारातून समृध्द केलेला महाराष्ट्र या रचनात्मक योगदानाचा वसा आणि वारसा पृथ्वीराजबाबा पाटील यांची मौल्यवान मिळकत होय.
शांत, संयमी, स्वच्छ चारित्र्य, उत्तम अभ्यासू आणि उच्चशिक्षित सुसंस्कृत व्यक्तीमत्व , सांगलीतील नागरी समस्या आणि लगतच्या ग्रामीण भागाच्या गावातील प्रश्नांचा अभ्यास व त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांची प्रामाणिक तळमळ हे गेल्या १० वर्षात आपण साक्षात पाहिलेले आहे.
अयोध्येच्या श्रीराम मंदिरांची प्रतिकृती उभारुन सांगली श्रीराममय केली आणि करदर्शनम - सांगलीचा नवरात्रोत्सव या उपक्रमांतर्गत साडेतीन शक्तीपीठांचे भव्य मंदीर उभारुन देवीचा व सदविचारांचा जागर आणि अखंड शिवज्योतीच्या स्थापनेतून नव्या पिढीला दिलेली शिवभक्तीची प्रेरणा या सांगलीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारख्या आहेत.
सांगलीकरांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक राहून पृथ्वीराजबाबा पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत.
गेल्या दहा वर्षांत सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सांगलीत काँग्रेसच्या पडत्या काळात पक्ष संघटना मजबूत करुन पक्षाची तळागाळातील लोकांपर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत केली. कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली आहे.
पृथ्वीराज पाटील यांनी सर्वसामान्यासाठी शैक्षणिक, सामाजिक व सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था निर्माण करून समाजातील तळागळातील हजारों युवक व युवतींना नोकरी व्यवसायच्या संधी निर्माण करून त्यांना स्वाभिमानी व स्वावलंबी बनवले आहे.
राजकारणात कोणतेही मोठे पद नसताना महाआघाडी सरकारच्या काळात रस्ते, पूल, दवाखाना इ. साठी कोट्यवधींचा निधी मंजूर करवून घेतला व त्या निधीतून कामेही पूर्ण झाली आहेत. गरीब, कष्टकरी, कामगार, मजूर, व्यापारी, नोकरदार अशा सर्व वर्गांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अन्यायी धोरणाविरोधी निदर्शने मोर्चे, आंदोलने करुन त्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
सांगली पंचक्रोशीत तीन वेळा आलेल्या महापुराच्या काळात पूरग्रस्त लोंकासाठीची मदत व जे पुनर्वसनाचे अवघड काम केले ते आणि जीवघेण्या कोरोना काळात केलेली सांगलीकरांची सेवा सांगली व पंचक्रोशीतील जनता कदापिही विसरु शकणार नाही.
शांत, संयमी, प्रेमळ व्यक्तिमत्व असणाऱ्या पृथ्वीराज पाटील यांची युवकांमध्ये चांगली प्रतिमा दिसून येत आहे. गेल्या दहा वर्षांत पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ, महागाई, बेरोजगारी, बंद उद्योधंदे, नोटाबंदी, भ्रष्टाचार, आर्थिक मंदी, जातीय व दडपशाहीच्या राजकारणामुळे नागरीक पुरते हैराण झाले आहेत. त्यांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागत आहे. अशावेळी या संकटातून वाचविण्याठी पृथ्वीराज पाटील यांना आमदार म्हणून निवडून देणं आवश्यक आहे.
देशाला आर्थिक संकटात टाकणाऱ्या, देशात मनुवादी विचारसरणी पसरविणाऱ्या जनसामान्याची चाड नसणाऱ्या , संवेदनाहीन सरकारला गाडण्यासाठी काँग्रेस पक्षाशिवाय आता पर्याय नाही हे सांगलीकरांच्या पुरेपूर लक्षात आले आहे.
सांगलीचा अपुरा आणि दुषित पाणीपुरवठा, खराब व जुनी ड्रेनेज व्यवस्था, खड्डेमय रस्ते व जीवघेणे अपघात, महाग वीज व पाणी पुरवठा, बोजवारा उडालेली आरोग्यव्यवस्था, बाल-अबाल वृध्दासाठी उद्यानांची व मैदानांची कमतरता, पार्किंग व वहातूक नियंत्रणाचा अभाव, महिला व मुलींच्यावर लैंगिक अत्याचार, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक नसणे आणि बोकाळलेला भ्रष्टाचार,स्वच्छता अभावी निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य, मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री, खुंटलेला औद्योगिक विकास आणि वाढती बेरोजगारी, एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेल्या सांगलीच्या वैभवाला लागलेली उतरती कळा, फळ व भाजीपाला आणि धान्य मार्केटची दयनीय अवस्था, औद्योगिक वसाहत, अभियंता व वास्तुशिल्पकार, फार्मासिस्ट, जिम सेंटर,यूट्युब व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया पत्रकार व वर्तमानपत्र विक्रेते, रिक्षावाले, आशा वर्कर्स, हमाल, शिक्षण क्षेत्रातील सर्व घटक, विद्यार्थी व पालक, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या काय आहेत हे समक्ष संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतून पृथ्वीराजबाबा पाटील यांनी समजून घेतल्या.
नागरिकांनी आपल्या समस्यावर बोलायचं आणि आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर त्या सोडवण्यासाठी कटीबध्द असल्याची हमी बाबांनी निवडणुकीच्या आधीच दिली. हा सांगलीचा पृथ्वीराज पाटील पॅटर्न जनतेच्या पसंतीस उतरला आहे. म्हणून आता सांगलीकर उत्स्फूर्तपणे म्हणू लागले, 'पृथ्वीराज पाटील यांच्या सारखा कामाचा व हक्काचा लोकप्रतिनिधी ही सांगलीची खरी गरज आहे. यावेळी सांगलीकर जनता पृथ्वीराज पाटील यांनाच भरघोस मतांनी निवडून देतील यात तिळमात्र शंका उरली नाही.
भविष्यात सांगली अधिक चांगली होण्यासाठी विधीमंडळात आवाज उठवण्याची व स्थानिक प्रशासनाच्या बोकांडी बसून जनतेची कामे करण्याची क्षमता असलेला व वडील सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणेच काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ नेता म्हणून प्रतिमा कृतीतून तयार केलेला आमदार म्हणून सांगलीकर पृथ्वीराजबाबा यांच्या विजयाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांना आमदार म्हणून पहाण्याचं भाग्य सांगलीकरांना लाभो हीच अपेक्षा..!
प्रा. एन.डी.बिरनाळे
कार्यकारी अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (शिक्षक सेल)