Sangli Samachar

The Janshakti News

ऐन दिवाळीत पोलीस विभागाकडून मिळालेल्या अनोख्या भेटीमुळे, त्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद, पोलिसांचे मानले आभार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ नोव्हेंबर २०२
मा. पोलीस अधीक्षक, श्री. संदीप घुगे मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम यांनी सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ शोध घेवून नागरिकांना ते परत करणेबाबतआदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईल तात्काळ शोध घेणेसाठी सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली मोबडे व पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण तसेच अमलदार यांचे पथक तयार करण्यात आले होते.

  त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गहाळ झालेले मोबाईलची तांत्रिक माहीती प्राप्त करून शोध घेतला असता सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे येथे दाखल गहाळ तक्रारी पैकी नागरीकांचे एकूण ७,५०,०००/- रू किंमतीचे ६० मोबाईल फोन शोधून काढण्यात पथकाला यश आले आहे. शोध घेवून मिळालेले मोबाईल खात्री करुन संबंधित नागरीकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर मॅडम यांच्या हस्ते परत देण्यात आले आहेत.

सर्व सांगली पोलीस दल निवडनुकीच्या कामास पुर्णपणे व्यस्त असूनहीसायबर पोलीस ठाणेच्या मार्फतीने नागरीकांना ही दिवाळीची भेट देण्यात आली आहे. आपले मोबाईल परत मिळाल्यामुळे संबंधित नागरीकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.


यावेळी सर्व मोबाईल धारकांच्यावतीने प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. अरुण कांबळे म्हणाले की, आम्ही गहाळ झालेला मोबाईल सापडण्याची अपेक्षा सोडून दिली होती. परंतु पोलीस खात्याने, विशेषतः सायबर ब्रांचने सातत्यपूर्ण प्रयत्न करून आमचे महागडे मोबाईल शोधून दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री. कांबळे यांनी यावेळी सर्व पोलिसांना दिवाळीच्या शुभेच्छा ही दिल्या.