| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० नोव्हेंबर २०२४
सांगली मिरज कुपवाड महापालिकानगरस्तरीय शिक्षक क्रीडा प्रशिक्षणाचे 2 ते 6 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी दिली.
मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांचे संकल्पनेमधून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि माणदेशी फौउंडेशन म्हसवड सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत 5 दिवशीय महापालिकेच्या शाळांमधील 100 शिक्षकांसाठी क्रीडा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळा शिवशक्ती व्यायाम शाळा येथे होणार आहे.
या कार्यशाळेत पोषण मार्गदर्शन, क्रीडाविषयक मूलभूत विकास, ट्रॅक अँड फिल्ड, कबड्डी, खो-खो खेळाची कौशल्ये शिकवली जाणार आहेत. महापालिका शाळेतील शिक्षकांना क्रीडाबाबत अद्ययावत करणे. विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग वाढवणे व क्रीडा कौशल्य विकसित करणे आदीमुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलांसाठी प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे.
महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे यांच्या प्रेरणेतून व माणदेशी फाउंडेशन म्हसवड यांच्या सहकार्याने सदर कार्यशाळा होत आहे. प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतिश कांबळे आदींनी प्रशिक्षणाचे नियोजन केले.