yuva MAharashtra मिरजेत सुगंधी तंबाखूचा बेकायदा साठा जप्त दोघांना अटक 12. 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, एल.सी.बी. ची धडक कारवाई !

मिरजेत सुगंधी तंबाखूचा बेकायदा साठा जप्त दोघांना अटक 12. 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, एल.सी.बी. ची धडक कारवाई !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ नोव्हेंबर २०२
मिरजेतील जुगाई कॉलनी येथे केलेला सुगंधी तंबाखूचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

अश्रफ बाबू सय्यद (वय 30, रा. वाखारबाग मिरज), मोईम मुबारक निपाणीकर (वय 34 अमननगर मिरज), अशी अटक केलेल्यांची नावे असून, या दोघांसह मुबारक सलीम मुजावर याच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू यांचा साठा, विक्री करणाऱ्या वर कारवाईसाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे विशेष पथक तयार केले होते.


हे पथक मिरज परिसरात ग्रस्त घालत असताना अश्रफ सय्यद यांने जुगाई कॉलनी येथे सुगंधी तंबाखूचा बेकायदा साठा केला असल्याची माहिती खबऱ्याकडून पथकाला मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकला असता या ठिकाणी सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सय्यद आणि निपाणीकर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर यामध्ये मुबारक मुजावर याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरील दोघांना मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.