yuva MAharashtra मृत्यूनंतर 11 दिवस मुलाला ठेवले व्हेंटिलेटरवर, संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल !

मृत्यूनंतर 11 दिवस मुलाला ठेवले व्हेंटिलेटरवर, संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० नोव्हेंबर २०२
फायमोसिस विथ पिनलाइन टॉर्शन (Phimosis with pinline torsion) (लघवीच्या जागेवरील खाज) या आजाराची सुमारे २५ मिनिटांत शस्त्रक्रिया होईल, असे सांगून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या साडेपाच वर्षांच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर ६ डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. बालकाला भुलीनंतर ३-३ इंजेक्शन्स देण्यात आली होती. 

मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. शस्त्रक्रियेपूर्वी, 'मम्मी टेन्शन मत लो, सिम्पलसी बात है,' असे सांगून तो ऑपरेशन थिएटरमध्ये गेला होता. विशेष म्हणजे, चिमुकल्याचा मृत्यू २४ एप्रिल २०२४ रोजी झाला. मात्र, त्यानंतर डॉक्टरांनी त्याला ११ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. हा धक्कादायक प्रकार गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात घडला होता. 


नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दैविक अविनाश अघाव असे या मृत बालकाचे नाव आहे. अविनाश दत्तात्रय आघाव (४१, रा. सप्तश्री वाटिका, स्वप्ननगरी, गारखेडा परिसर) यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा दैविकला गुप्तांगावर खाजेचा त्रास होत होता. त्यामुळे २० एप्रिल रोजी त्याला वेदांत बाल रुग्णालयात नेले. तेथे डॉ. अर्जुन पवार यांनी त्याला तपासले. 

‘फायमोसिस विथ पिनाइल टॉर्शन’ हा आजार असल्याचे सांगून त्यासाठी छोटेसे ऑपरेशन करावे लागते. त्याचा १६ हजार रुपये खर्च येतो, अशी माहिती दिली. २६ एप्रिल रोजी ऑपरेशन ठरले. २५ एप्रिल रोजी रात्री दैविकला रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी १० हजार रुपये भरले. २६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता त्याला ऑपरेशनसाठी नेण्याची तयारी केली. सव्वासात वाजता डॉ. अर्जुन पवार, भूलतज्ज्ञ डॉ. शेख मोहंमद इलियास आले. २५ मिनिटांत ऑपरेशन होईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, ४५ मिनिटे झाली तरी ऑपरेशन झाले नव्हते. एक तासाने डॉ. पवार ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. डॉ. इलियास यांनी बाळाला स्पाइनलमध्ये भूल दिली होती. पण, त्याने हात हलवल्यामुळे झोपेचे इंजेक्शन दिले. बालक सध्या बेशुद्ध असल्याचे सांगितले.

घटना सीसीटीव्हीत कैद

दैविकला भूल दिल्यानंतर तीन इंजेक्शन्स ​​​​​​्देण्यात आली. याचे सीसीटीव्हीत चित्रीकरण झाले आहे. हे इंजेक्शन कशाचे होते याची समितीला माहिती नाही. ११ दिवस दैविक व्हेंटिलेटरवर होता. ६ जून २०२४ रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

दरम्यान या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असून, अशा प्रकारामुळे समाजाचा डॉक्टरांवरील विश्वास उडेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. डॉक्टरने देवदूत मानले जाते. काही अपवादात्मक प्रसंगात रुग्णाचा प्राण जातो, मात्र याला डॉक्टर्स जबाबदार असतातच असे नाही. मात्र जेव्हा एखाद्या प्रसंगात हलगर्जीपणाने एखाद्या रुग्णाचा प्राण गेला तर त्याला डॉक्टर्सनाच जबाबदार धरायला हवे, असेही बोलले जात आहे.