Sangli Samachar

The Janshakti News

सुधीरदादा गाडगीळ यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे सांगलीतील मेळाव्यातून आव्हान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० ऑक्टोबर २०२
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात सांगलीचा कायापालट केला आहे. त्यांना पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करा, असे आवाहन येथे प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात करण्यात आले. सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते तसेच भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख तसेच बूथ प्रमुख यांचा मेळावा येथे झाला. त्यावेळी सर्वच वक्त्यांनी दादांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

आमदार सुधीरदादा गाडगीळ, भारतीय जनता पक्षाचे नेते महांतेश कवटगीमठ, पक्षाचे नेते रघुनाथ कुलकर्णी, सांगली मतदारसंघाचे निरीक्षक आमदार अभय पाटील, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, पक्षाचे नेते मकरंद देशपांडे, पैलवान दिलीप सूर्यवंशी आदींनी मनोगत व्यक्त केले.


यावेळी अनेक वक्त्यांनी सांगितले की महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीणसह अनेक योजना आखल्या आहेत. त्याचबरोबर शेतकरी, कामगार, युवक, दलित तसेच विविध समाज घटकांसाठी वेगवेगळी महामंडळे स्थापन करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आणि त्यांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. विशेषतः महिला वर्गाने भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सरकारचे हात बळकट करण्यासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनीच घरोघर प्रचार केला आणि ही निवडणूक हातात घेतली तर महायुतीला राज्यात प्रचंड यश मिळेल. सांगली विधानसभा मतदारसंघातही महिलांसाठीच्या तसेच सर्व समाज घटकांसाठीच्या शासनाच्या योजना राबवण्यासाठी सुधीरदादा गाडगीळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच सांगली शहरासह मतदारसंघात रस्ते, वीजपुरवठा, समाज मंदिरे, सम जोपयोगी बांधकामे, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, नळ पाणीपुरवठा यासाठी दादांनी प्रचंड काम केले आहे. ते सर्व काम जनतेला माहित आहेच परंतु आणखी एकदा या कामाची माहिती व महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या निवडणूक काळात सर्व पक्षप्रमुखांना, बूथ प्रमुखांना आणि शक्ती केंद्र प्रमुखांना करायचे आहे.

सांगली पेठ रस्त्याचे रुंदीकरणासह दुरुस्तीचे काम सुधीरदादांच्या पाठपुरावाम ळेच सुरू झाले आहे. सांगलीजवळचा विमानतळाचा प्रश्न केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून सुधीरदादा गाडगीळ यांनीच केंद्र सरकारपर्यंत पोहोचवलेला आहे. आता लवकरच सांगलीकरांचे विम नितळाचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. सांगली कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण मंजूर झाले असून त्यामुळे सांगली ते कोल्हापूर हा प्रवास अधिक जलद गतीने होणार आहे. याशिवाय सांगली मतदारसंघात अनेक नवे रस्ते करून तसेच तब्बल सहा पूल बांधून दळणवळण आणि वाहतुकीची

उत्तम सोय सुधीरदादांच्यामुळे झालेली आहे. सांगलीसाठी अद्यावत सुसज्ज नाट्यगृह मंजूर झाले आहे.

आमदार गाडगीळ म्हणाले, गेल्या दहा वर्षात सांगली मतदारसंघाचा विकास करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. सांगलीचा विकास हाच अजेंडा डोळ्यासम ोर ठेवून काम केले. यापुढेही मला सांगली आणखी चांगली बनवायची आहे. येथे उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम मिळवून द्यायचे आहे. त्यासाठीच सांगली पेठ, सांगली- कोल्हापूर हे हायवे कनेक्टिव्हिटी मिळवून देणारे रस्ते मंजूर केले आहेत. ते रस्ते झाल्यानंतर ही कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळेल. त्याम ळे सांगलीत मोठे उद्योग येऊ शकतील. क्रीडानगरी म्हणून, व्यापारनगरी म्हणून सांगली राज्याच्या आणि देशाच्याही

नकाशावर ठळक करायची आहे. सर्वांनी आवाहन केले की पुन्हा एकदा या सर्व कामांची लोकांपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांनी उजळणी केली पाहिजे.

भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, जयश्रीताई देसाई, मुन्ना कुरणे, व माजी नगरसेवक युवराज बावडेकर, विजय साळुंखे, अतुल माने, विश्वजीत पाटील , उर्मिला बेलवलकर, चेतन माडगूळकर अभिजीत मिरासदार, अविनाश मोहिते, बटूदादा बावडेकर, सुरेशदादा पाटील, सुनिता मदने, शरद देशमुख, माजी महापौर गीता सुतार, शुभम चव्हाण, अनिकेत खिलारे आदी उपस्थित होते.