Sangli Samachar

The Janshakti News

गर्लफ्रेंड हवी ती दाढी ? मुलींनी केला आंदोलनातून सवाल ? चर्चा तर होणारच !


| सांगली समाचार वृत्त |
इंदूर - दि. २२ ऑक्टोबर २०२४
अलीकडील मुलांमध्ये दाढी वाढवण्याची क्रेझ दिसून येत आहे. दाढी शिवाय मुलांची मर्दानगी दिसून येत नाही असे काही जे म्हणणे. तर काहींना वाटते धाडे शिवाय मुलांचे सौंदर्य अपुरे. म्हणूनच कॉलेज मधील तरुण असोत किंवा उरण टप्पू म्हणून फिरणारे मवाली टाईप. सर्वांच्याच चेहऱ्याला दाढीचा वेढा दिसून येतो.

या पार्श्वभूमीवर इंदूर येथील एक आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे या मुलींची मागणी आणि अनोख्या घोषणा यामुळे या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.  इंदूर येथील काही कॉलेज तरुणी हातात अनोख्या घोषणा लिहिलेल्या बोर्डसहित एकत्र येत, आंदोलन केले आहे. "बिअर्डलेस बॉयफ्रेंड की तमन्ना अब हमारे दिल में है |"... "बियर्ड हटाओ प्यार बचाओ, बियर्ड रखो या गर्लफ्रेंड चॉईस तुम्हारी |"नो क्लीन शेव्ह  नो लव !" असे पोस्टर्स हातात घेऊन या तरुणी महाविद्यालया बाहेर घोषणा देत होत्या.


या अनोख्या आंदोलनाची चर्चा इंदूर शहरात तर होत आहेच, परंतु आता सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे या आंदोलनाची चर्चा देशभरात होऊ लागले आहे. आता या आंदोलनाचे लोण कुठवर पोहोचते हाच उत्सुक याचा विषय ठरला आहे.

परंतु हे आंदोलन नेमके "कोणत्या दाढी विरोधात आहे ?" अशीही चर्चा सोशल मीडिया वरून होत आहे. कारण गेल्या कित्येक दिवसात एका विशिष्ट समाजावर याबाबतीत आरोपांच्या फैरी झडत असून, तरुणींना आपल्या प्रेमजालात फसवून, सोडून देण्यात असल्याच्या काही घटना समोर आल्याचा आरोपही होत आहे. काही असले तरी दाढी विरोधात उभ्या टाकलेल्या या तरुणी चर्चेचा विषय बनल्या आहेत.