yuva MAharashtra सांगली शहरातील वाढती गुन्हेगारी व अमली पदार्थ तस्करीला तातडीने आळा घाला - पृथ्वीराज पाटील

सांगली शहरातील वाढती गुन्हेगारी व अमली पदार्थ तस्करीला तातडीने आळा घाला - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
सांगली शहरात अमली पदार्थाची तस्करी वाढली आहे. युवा वर्ग मोठय़ा प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली असून काल संजयनगरात एका विकृत व अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या नशेबाज व्यक्तीने एका मुलीवर अत्याचार केले. यापूर्वीही त्या नराधमांने असे लैंगिक शोषणाचे विकृत प्रकार केले आहेत. गेल्या महिन्यातही संजयनगर भागात दोन मुलींवर अत्याचाराच्या दुर्दैवी घटना घडल्या. महिलांवरील अत्याचार व गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार घडत आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे.याप्रकरणी तातडीने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आज सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी समक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली.

यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांशी बोलताना पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले की, विश्रामबाग चौकातील काही दुकानात सर्रास अंमली पदार्थाची देवघव होत आहे, अशी माहिती मिळाली आहे. एस. टी स्टँड परिसरातील आण्णासाहेब पाटील नगरात अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या युवकांची संख्या वाढली आहे. अंमली पदार्थ तस्करीला व शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला तातडीने आळा घाला व याप्रकरणी छडा लावून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केली आहे.

यावेळी सनी धोतरे, अल्ताफ पेंढारी, धनराज सातपुते, अय्युब निशाणदार, नितीन तावदारे, वसीम बलवंड, जाफर शेख, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते