yuva MAharashtra महायुतीसाठी विधानसभेचे गणित बिघडवणाऱ्या मुद्द्यातून राहुल गांधी यांनी दिले थेट आव्हान !

महायुतीसाठी विधानसभेचे गणित बिघडवणाऱ्या मुद्द्यातून राहुल गांधी यांनी दिले थेट आव्हान !


| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ६ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा केवळ पश्चिम महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठीच महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. संविधान सन्मान संमेलनात केलेले भाषण महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकणार आहे.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले ते जातीनिहाय जनगणना हा भारताचा एक्स-रे आहे. यातून कुठे आणि किती मार्क लागला आहे ते समोर येणार असल्याने आम्हाला हा एक्स-रे काढावा लागणार आहे. जातीनिहाय जनगणना करण्याबरोबरच आम्ही आरक्षणाची मर्यादा आहे वाढविणार आहोत. यासाठी लोकसभेत आम्हाला महायुतीसमोर जायचे आहे. यासाठी मोदी असोत की भाजपा आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. या दोन गोष्टी केल्यानंतरच खरं राजकारण सुरू होणार आहे असे सांगून राहुल गांधी म्हणाले की जातीनिहाय जनगणना सुरू झाली तर सर्व देता आपल्या हाती असेल.


महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पेटले आहे. त्यावर भाष्य करताना राहुल गांधी यांनी, आरक्षणाची 50% यांची मर्यादा हटवणार जातीनिहाय जनगणना करणार आणि सोशिओ इकॉनॉमिक्स सर्वे करणार अशा तीन महत्त्वपूर्ण घोषणाच केल्या.

यावेळी बोलताना राजीव गांधी म्हणाले की आम्ही अशीच आश्वासने देत नाही तर आम्ही जे बोलतो ते करतोच. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा काँग्रेस आणि इंडिया आघाडी बदलणार आहे. त्याचबरोबर मला जो क्रांतिकारी उपाय वाटतो तो म्हणजे जातीनिहाय जनगणना. देशात किती ओबीसी आहेत हे कोणालाच कायदेशीर दृष्ट्या माहिती नाही. जाती जनगणनेनंतर अधिकृत माहिती मिळेल. यावरून कोणाची किती लोकसंख्या आणि वेगवेगळ्या वर्गाचे भारताच्या आर्थिक सिस्टीम मध्ये किती हे लक्षात येईल, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

सोशो इकॉनोमिक सर्वेचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाली की भारताच्या विविध संस्थेत हा वर्ग किती आहे ? आदिवासींच्या तसेच ओबीसींच्या हातात किती पैसा आहे ? मीडिया, न्यायव्यवस्था आणि लोकशाहीत किती दलित व ओबीसी तसेच आदिवासी आहेत ? कोण किती बजेट सांभाळत आहे ? अशा प्रश्नांची जंत्रीच राहुल गांधी यांनी सादर केली.

यावेळी बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले की एखाद्याला मार लागला आणि डॉक्टर काढायला सांगितला तर आपण तो लगेच काढतो. जातीनिहाय जनगणना हा भारताचा एक्स-रे आहे. आम्हाला ठाऊक आहे मार लागलाय पण तो किती आहे ? नेमकं काय होते हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही हा एक्स-रे काढणार आहोत, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे.

भाजपला सत्य लपवायचं आहे यासाठीच त्यांचा जातीनिहाय जनगणनेला विरोध आहे. देशातील 90 टक्के लोकांना देशाची संपत्ती, सिस्टीम कुणाच्या किती हातात आहे ? हे या लोकांना जनतेस कडून द्यायचे नाही. असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, भाजपा आणि संघाने सर्व रस्ते आपल्याला उघडायचे आहेत. संविधानाचे संरक्षण करायचं आहे. ते गेलं तर सारंच गेलं. हे दाखवून दिलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी 400 पारचा नारा देत होते. 56 इंचाची छाती होती. तेव्हा देशातील जनतेने एक शब्दही न बोलता, 'तुम्ही संविधानाला हात लावला तर काय होतं ते बघा' असा इशारा निकालातून दिला. 

मोदींनी लोकसभेत जेव्हा संविधान डोक्याला लावलं ते सर्वांना आवडलं. पण त्यांना ते डोक्याला लावावं लागलं, ते सर्वांना आवडलं. मात्र त्यांना ते डोक्याला लावावे लागले. मात्र ते संविधान मानत नाहीत. अर्थात जनतेच्या शक्ती पुढे त्याला झोका व लागल्याचंही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले.