yuva MAharashtra महाआघाडीत अखेर काँग्रेसच ठरला मोठा भाऊ, खोड्यात अडकवणाऱ्या शरद पवार, उद्धव ठाकरेंना दिला धोबीपछाड !

महाआघाडीत अखेर काँग्रेसच ठरला मोठा भाऊ, खोड्यात अडकवणाऱ्या शरद पवार, उद्धव ठाकरेंना दिला धोबीपछाड !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २७ ऑक्टोबर २०२
काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना राजकारणातील मुरब्बी शरद पवार यांनी टाकलेल्या '85' च्या खोड्यात अडकवण्याचा प्रयत्न, दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनी आणून पाडला आणि अखेर उमेदवारीची शंभरी पार केली.

उमेदवारांबाबतची माहिती देताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, यापैकी 87 उमेदवार जाहीर केले असून, उर्वरित 14 उमेदवारांची यादी आज रात्रीपर्यंत जाहीर होईल. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनीही दुजोरा दिला आहे.

काँग्रेसच्या शंभरीपार जाहीर केलेल्या उमेदवारी बद्दल प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले की, जिथे जो पक्ष जिंकू शकेल तिथे त्या पक्षाचे उमेदवार उभे राहतील, असे उमेदवार देऊन जर काँग्रेस 100 जागा लढवत असेल तर आम्हाला त्रास होण्याचे कारण नाही. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या देहबोलीवरून काँग्रेसने महाआघाडीत आपले वर्चस्व सिद्ध केल्याचेच चित्र दिसून येत आहे.


शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला 85 च्या खोड्यात अडकवले. संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात ज्यावेळी त्यांना सिल्वर ओक वर भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्येकी 85 जागा लढवण्याचे निश्चित झाले आहे, असे तुम्ही जाहीर करा उरलेल्या जागा जागांवर मित्र पक्षांची चर्चा सुरू आहे असे सांगा असे पवारांनी अशी सूचना पवारांनी या सगळ्या नेत्यांना केली होती. त्यानुसार त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकी 85 जागा लढवण्याचा फॉर्म्युला जाहीर केला, पण संजय राऊत यांनी बेरीज चुकली. 255 ची बेरीज 270 सांगितली. पवारांच्या खोड्यात काँग्रेस अडकली.

पण दिल्लीतील चलाख नेत्यांनी पवारांची 'गेम' ओळखली आणि जाहीर झालेल्या 85 च्या खोड्यातून आपली अलगद सुटका करून घेतली. यासाठी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. दिल्लीतील बैठकीत त्यांनी काँग्रेस 101 जागावर लढेल असे स्पष्ट केले. आणि शरद पवार व उद्धव ठाकरे यांना 85 च्या निर्णयावरून पाऊल मागे घ्यावे लागले. सध्या राजकीय वर्तुळात पवार-ठाकरे यांच्या केलेल्या गोचीची चर्चा सुरू आहे.