| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑक्टोबर २०२४
सांगली म्हणजे नाट्य पंढरी, कलाकारांची खाण... शतकाहून अधिक इतिहासाचे परंपरा घेऊन अनेक नामवंत कलावंत येथे घडले आहेत. त्यांच्यामुळे अगदी सातासमुद्रपर सांगलीचा नावलौकिक अगदी साता समुद्रा पार गेला आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आजही अनेक कलाकार सांगलीचे नाव देशाच्या किंबहुना जगाच्या नकाशावर सुवर्ण अक्षराने कोरत आहेत.
याच कलेचा एक अविभाज्य भाग म्हणजे संगीत, गीत गायन... कराओकेच्या रूपाने 1970 मध्ये या संगीत क्षेत्रात एका नव्या कल्पनेने जन्म घेतला. आणि या क्षेत्रात देशभरातील अनेक गायकांप्रमाणे सांगलीतही अनेक कराओके कलाकार यातील एक महत्त्वाचा भाग बनले...
सध्या कराओके गीतातून आनंद घेणारा न् देणारा एक मोठा वर्ग दिसून येतो. अनेक नवनवीन कलाकार या क्षेत्रात येऊ पाहताहेत. परंतु त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळतेच असे नाही, आणि म्हणूनच अशा कलाकारांसाठी सांगली समाचार वेब पोर्टल व स्टार म्युझिकल ग्रुप यांच्यामार्फत दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी सांगली कोल्हापूर रोडवरील दैवज्ञ भवन येथे भव्य कराओके गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथमच महिला व पुरुष अशी स्वतंत्र भव्य बक्षीसे देण्यात येणार आहेत. यासाठी पहिले बक्षीस ५००१ रु., प्रमाणपत्र व ट्रॉफी, दुसरे बक्षीस ३००१ रु. प्रमाणपत्र व ट्रॉफी तर तिसरे बक्षीस २००१ प्रमाणपत्र व ट्रॉफी, पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ ५०१ रु. प्रमाणपत्र व ट्रॉफी असे बक्षीसाचे स्वरूप आहे. तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
या भव्य अशा स्पर्धेत अधिकाधिक कराओके कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्टार म्युझिकल इव्हेंट ग्रुपचे संयोजक झाकीरभाई नदाफ व सांगली समाचार न्यूज पोर्टल चे संपादक रमेश सरडे यांनी केले आहे.