| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ ऑक्टोबर २०२४
काँग्रेस पक्षाचे कार्यकुशल युवा नेतृत्व माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थित आज जाहीर पक्ष प्रवेश घेण्यात आला. त्याचबरोबर आज पक्ष प्रवेश होताच अभिजित भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली, नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष मा.जयंतरावजी साहेब साहेबांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी अभिजित भोसले म्हणाले की, पक्षाचे पुरोगामी विचारव ध्येय धोरणे तळागाळात पोहचविण्यासाठी व पक्षाच्या माध्यमातून लोकहिताची कामे करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब यांच्या नेतृत्वाखाली फकत पक्ष संघटना म्ह्णून नव्हे, तर लोकहीत डोळ्यासमोर ठेऊन काम करेन.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अध्यक्ष सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज, तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष समीर कुपवाडे, शहर कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, डॉ. पृथ्वीराज पाटील, अजित दुधाळ, आकाराम कोळेकर, वाजीद खतीब,निलेश शहा व प्रमुख सचिव डॉ शुभम जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अभिजित भोसले हे एक आक्रमक युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाते. काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी गतवेळची महापालिका निवडणूक लढवली होते. विस्तारित भागातील अधिकाधिक समस्या दूर करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते दिवंगत त मदन भाऊ पाटील आणि आता श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या गटाचे मानले जातात. मात्र त्याने तुतारी हातात घेताना श्रीमती जयश्रीताई पाटील गटाचा हात का सोडला ? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळू शकले नाही. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) अचानक पक्ष प्रवेशाने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.