yuva MAharashtra संघाच्या नवदुर्गा सन्मान सोहळ्यात मान्यवरांनी करून दिली नारीशक्तीची जाणीव !

संघाच्या नवदुर्गा सन्मान सोहळ्यात मान्यवरांनी करून दिली नारीशक्तीची जाणीव !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑक्टोबर २०२४
नवरात्री म्हणजे नऊ देवींची उपासना. यानिमित्ताने महिलांचे या काळातील महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न विविध संस्था, संघटना आणि पक्ष माध्यमातून होत असतो. या नवरात्रीत सांगलीतील भाजपचे विद्यमान आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' मेळाव्यातून महिलांशी संवाद साधित, त्यांना त्यांच्या शक्तीची आणि उपयुक्त त्याची जाणीव करून दिली. 

त्याच वेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी मार्केट यार्ड शेजारील सरस्वती नगरात उभारलेल्या नवदुर्गा मंदिराच्या माध्यमातून सांगलीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना एकत्रित करीत त्यांचा सन्मान केला. यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवत आपले मनोगत व्यक्त केले.

त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्क विभागामार्फत 'नवदुर्गा सन्मान सोहळा' सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ. प्रियदर्शन चितळे यांनी भूषवले. यावेळी सांगलीतील प्रसिद्ध समुपदेशक सौ अर्चना मुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर प्रमुख वक्त्या म्हणून लेखिका सौ विनेता तेलंग यांनी मार्गदर्शन केले.

दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमापूजनाने माझे सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रियदर्शन चितळे यांनी केले. आपल्या मनोगत त्यांनी मातृशक्तीचे समाजातील महत्त्व, त्यांचे संस्कार आणि मूल्यांचे पुढील पिढ्यांमध्ये हस्तांतर या विषयावर अतिशय सुरेख शब्दात विचार मांडले.


यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील सौ. नंदा झाडबुके, आर्थिक क्षेत्रातील सौ. अर्चना पवार, वैज्ञानिक क्षेत्रातील सौ. स्नेहल कोरडे, अन्य क्षेत्रात सौ. रोहिणी तुकदेव, धार्मिक क्षेत्रातील सौ. विद्या कुलकर्णी, कला क्षेत्रातील सौ. धनश्री आपटे, अधिवक्ता सौ. दीपा चौंडीकर, चिकित्सा क्षेत्रातील डॉ. (सौ.) जाई कुलकर्णी आणि क्रीडा क्षेत्रातील (सौ.) शिल्पा दाते-काळे यांचा सन्मानचिन्ह आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला. या सर्वांना सन्मान चिन्ह आणि रूप देण्यात आले.

यावेळी समुपदेशक सौ अर्चना मुळे यांनी आपल्या समुपदेशनातील अनुभव कथन करून मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर भाष्य केले. प्रमुख वक्त्या सौ. विनिता तेलंग यांनी नऊ देवींच्या नऊ रूपावर विवेचन करीत भारतीय स्त्री शक्तीचे महत्त्व सध्याच्या युगात कसे आहे हे पटवून दिले. यावेळी त्यांनी लव्ह जिहादचा आतंकवाद, त्यावर उपाय आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांची भूमिका काय असावी याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सांगता कल्याण मंत्राने करण्यात आली. यावेळी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.