Sangli Samachar

The Janshakti News

शाहरुख खानशी भिडलेल्या समीर वानखेडे यांची, थेट विधानसभा निवडणूक रिंगणात उडी ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ ऑक्टोबर २०२४
मध्यंतरी शाहरुख खानचा दिवटा चिरंजीव आर्यन खान याच्यासह अनेक बड्या बापांच्या बिघडलेल्या मुलांना कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणात तुरुंगात डांबणारे जांबाज आयआरएस (इंडियन रेवेन्यू सर्विस) समीर वानखेडे हे राजकारणात प्रवेश करणार असून, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेमार्फत ते धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पण समीर वानखेडे हे नेमके कोण ? त्यांचा नेमका मुद्दा काय याबाबत अनेकांना माहिती आहेच असे नाही, अशांसाठी ही बातमी... 44 वर्षीय समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस (इंडियन रेवेन्यू सर्विस) अधिकारी असून 2021 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर म्हणून कर्तव्य बजावत होते. त्याचप्रमाणे त्यांनी एनसीबी मध्ये रुजू होण्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्येही काम केले होते. त्यांची संपूर्ण शासकीय सेवा ही अमली पदार्थांच्या अंमलबजावणीशी संबंधित विविध खात्यात झाली आहे. त्याचप्रमाणे गुप्तचर कारवाया आणि अमली पदार्थांचे तस्कर यांना टार्गेट करीत अनेकांच्या नुसत्या आवडल्या आहेत. आपल्या एकूण पंधरा वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी तब्बल 17000 किलो अमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त केले आहे.


त्यांचे महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद टोळीचे ड्रग कनेक्शन त्यांनी उध्वस्त केले त्याचबरोबर झाकीर नाईक या धर्मोपदेशक राहिलेल्या व्यक्ती विरोधात मनी लॉन्ड्रींचा खटला दाखल केला होता त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध गायक मिका सिंग याला कस्टमर प्रकरणात त्यावर घेतले होते. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे 'कोंबडी पळाली फेम' मराठी चित्रपट अभिनेत्री क्रांती रेडकर ही त्यांची पत्नी होय.

काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड या आपल्या बहिणीला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवू इच्छित आहेत. त्यांचा या लोकसभा व विधानसभा मतदारसंघावर चांगलाच 'वट' आहे. वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजपाने लोकसभा निवडणुकीत सुप्रसिद्ध कायदे तज्ञ उज्वल निकम यांचे कार्य खेळले होते. परंतु वर्षा गायकवाड यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्यामुळे, न्यायालयीन रणांगणात सिंघम असलेले निकम निवडणूक रणांगणात मात्र पराभूत झाले. आता शिंदे शिवसेनेने समीर वानखेडे यांचे कार्ड गायकवाड भगिनी विरोधात वापरण्याचे ठरवले असून, ते कितपत यशस्वी होते हे, वानखेडे खरंच निवडणूक रिंगणात उतरणार का ? आणि उतरलेच तर यशस्वी ठरणार का ? हा सुद्धा चर्चेचा मी औत्सुक्याचा विषय ठरला आहे.