| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑक्टोबर २०२४
सांगली महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, या मोहिमेत जप्त केलेल्या साहित्याचा दिला त्याच दिवशी करण्यात येणार आहे. यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी एका प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली आहे.
मुख्य प्रशासकीय कार्यालयात विविध विषयावर प्रशासनाच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापालिका क्षेत्रातील अतिक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्णय झाला. यावेळी जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव त्याच दिवशी करण्यात येईल, तर जप्त करण्यात आलेला भाजीपाला निवारा केंद्रात व प्रसुतीगृहात देण्यात येणार आहे.
माझे अतिक्रमण हटाव मोहिमेत जप्त करण्यात आलेले साहित्य महापालिकेकडे तसाच पडून आहे, त्यातील काही चोरी होण्याचे प्रकारही घडले आहेत, तर भाजीपाल्यामुळे कचरा झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करण्याचे निश्चित केले आहे. आठवड्यात सांगली मिरज व कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेली बेकायदेशीर खोकी हटवण्याबरोबरच, रस्त्यावरील व्यापाऱ्यांचे साहित्य व फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण जप्त करण्यात येणार आहे. यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती ही या प्रसिद्धी पत्रिका देण्यात आली आहे.