Sangli Samachar

The Janshakti News

पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदीर दर्शनासाठी भाविकांची गर्दी !




| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
कोल्हापूरची श्री अंबाबाई, तुळजापूरची श्री भवानी, माहुरगडची श्री रेणुका आणि नाशिक वणीची देवी सप्तश्रुंगी या साडेतीन शक्तीपीठांचे भव्य व नेत्रदीपक मंदीर पृथ्वीराज पाटील फौंडेशनने सांगलीत टाटा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, उद्योग भवन शेजारी विस्तीर्ण अशा मैदानावर उभे केले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या साडे तीन शक्तीपीठांच्या दर्शनाने भाविकांच्या मनात देवींचा आणि कर्तबगार थोर महिलांच्या विचारांचा जागर सुरु झाला आहे. 

करदर्शनम - सांगलीचा नवरात्रोत्सव देवींचा भक्तींने ओसंडून वहात आहे. असे प्रतिपादन या उपक्रमाचे संकल्पक पृथ्वीराज पाटील केले आहे. दि. ३ ऑक्टोबरपासून टाटा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, उद्योग भवन शेजारी, सरस्वती नगर येथे पृथ्वीराज पाटील फौंडेशनने आयोजित केलेला हा नवरात्रोत्सवाचा भक्तीमय कार्यक्रम. दि.१२ ऑक्टोबर पर्यंत चालणार असून दररोज स.१० ते रात्री १० वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदीर खुले राहणार आहे व दररोज सायंकाळी ६ वा.विविध सांस्कृतिक कार्यक्रम व गायन, नृत्य, नाट्याविष्कार, व्याख्यान व मुलाखत असे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पृथ्वीराज पाटील फौंडेशनकडून मिळाली आहे.


दरम्यान दि.३ रोजी परेश पेठे यांचा स्वर सणांचे हा भक्ती गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. महाराष्ट्राची शक्तीपिठे हा आध्यात्मिक व सांस्कृतिक दर्शनाचा भव्य कलाविष्कार ४ ऑक्टोबरला संपन्न झाला. यशस्वी उद्योजिका जयंती कठाळे यांच्या खास मुलाखतीचा कार्यक्रम ६ ऑक्टोबर, ५ ऑक्टोबर रोजी गोंधळ जागर तर ७ ऑक्टोबर रोजी जागर स्त्री शक्तीचा या अनोख्या प्रेरणादायी नृत्य-नाट्याविष्कार कार्यक्रमास भाविकांनी उचलून धरला. दि. १२ ऑक्टोबर अखेर चालू राहणाऱ्या या उपक्रमात अद्याप गायन, व्याख्याने व विविध कार्यक्रम होणार आहेत.

दररोज हजारो भाविकांचा जनसागर साडेतीन शक्तीपीठांच्या देवींचा दर्शनासाठी लोटत आहे त्यामुळे सांगली साडेतीन शक्तीपीठांच्या मंदीरामुळे देवीमय झाली आहे. दररोज मंदीर दर्शनासाठी विविध सामाजिक स्तरावरील भाविक विशेष करुन महिला वर्गाची संख्या लक्षणीय असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. आकर्षक रोषणाई करण्यात आलेल्या भव्य मंदिरात दररोज सकाळ सायंकाळी विधिवत आरती व पूजा होते आणि भक्तांना प्रसाद वाटप केले जाते.