Sangli Samachar

The Janshakti News

महाआघाडीत ना कोणी मोठा भाऊ ना कोणी छोटा, सर्वांना समान जागेतून मिळाला वाटा ! आता लक्ष उमेदवारी निवडीकडे !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ ऑक्टोबर २०२४
महाआघाडीतील जागा वाटपावरून आलेले चर्चेची घोडे आता ताजेतवाने होऊन निवडणुकीत धावण्यासाठी सज्ज झाले आहे. महाआघाडीत ना कोणी मोठा भाऊ ना कोणी छोटा, सर्वांना समान जागेतून वाटा मिळाला आहे. आता सर्वांचे लक्ष उमेदवारी निवडीकडे लागून राहिले आहे. जागावाटप करीत असताना काँग्रेस, उद्धवसेना आणि शरदबाबूंच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी 85 जागा वाटप झाले असून, बरोबरच समाजवादी पार्टी व शेकाप यांना सामावून घेण्यात येणार आहे. 

आता 288 जागांपैकी उर्वरित जागेवर समाजवादी पार्टी व शेकाप यांच्यासोबत चर्चा करून संधी दिली जाणार आहे, अशी घोषणा मुंबई येथील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केली. यावेळी बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटी,ल विजय वडेट्टीवार, अनिल देसाई हे उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाआघाडीतील सर्वच प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यावेळी विदर्भातील काही जागावर जो वाद होता तो यातून सोडवण्यात आला असून महाआघाडी एक संघपणे महायुतीला समर्थपणे तोंड देण्यास सज्ज झाली आहे.


यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाआघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या सोबत झाले असून त्यामध्ये समान जागा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादीस प्रत्येकी 85 जागा वाटपाचे धोरण ठरले आहे. उर्वरित 18 जागा बाबत शेकाप, कम्युनिस्ट पार्टी, आणि समाजवादी पक्षासोबत चर्चा सुरू आहे. आज किंवा उद्या याबाबत स्पष्टता दिसून येईल.

महाआघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेले नाही असे सांगून संजय राऊत म्हणाले की आमच्या पक्षातर्फे जाहीर झालेले 65 उमेदवारांमध्ये फेरबदल होऊ शकतात. त्यामुळे आमच्यात आता कोणताही वाद नाही. राज्यात सध्या जरी लाडकी बहिणी योजनेचे वारे असले तरी, जनतेतील नाराजीच्या टाचणीने त्यातील हवा लवकरच कमी होईल. त्यामुळे हा फुगवलेला फुगा फुटणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.