Sangli Samachar

The Janshakti News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले !


| सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. १९ ऑक्टोबर २०२४
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम आता सुरू झाली असून, निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तिन्ही आघाडीकडून प्रयत्नांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. एकीकडे महाआघाडीचे अपवादात्मक जागावर घोडे आणले असले तरी, त्यातून मार्ग काढीत एकजुटीने विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे. बहुसंख्य जागांवर एकमत झाले असले तरी विदर्भातील काही जागावर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना आग्रही आहे.

तर इकडे महायुतीत सारे काही आलबेल नसले तरी प्रत्येकाची स्वतःची गरज लक्षात घेऊन महायुतीतील नेत्यांनी प्रसंगी दोन पावले मागे येण्याची भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे संभाव्य उमेदवार एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबतचे निर्णय गेल्या काही दिवसात येईल बैठकींच्या सत्रातून घेण्यात आला आहे.


याच पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. या ठिकाणी जागा वाटपाचा अंतिम मसुदा तयार करण्यात येणार असून, मतभेद टाळून एकास एक उमेदवार देण्याचा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न आहे. आणि याच बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्ली येणाच्या तयारीत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले ची माहिती समोर येत आहे.

दिल्लीला येण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे आपल्या सहका-यांसह मूळ गावी म्हणजे सातारा जिल्ह्यातील बरे या गावी आले होते. दिल्लीला उपस्थित राहण्याचा निरोप आल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश छोटे आणि विशेष कार्यकारी अधिकारी कवळे यांच्या समवेत हेलिकॉप्टर मधून पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र अचानक ढगाळ वातावरण आला पाऊस यामुळे कोयना बॅक बॅटरच्या अगदी पंधरा फुटापर्यंत हेलिकॉप्टर खाली आणावे लागले होते. परंतु हेलिकॉप्टर पायलटने कौशल्याने हे विमान दरे या मूळ गावी आणले. आणि सर्वांनीच सुटकेचा निस्वास सोडला. त्यानंतर तेथून एकनाथ शिंदे आपल्या लवाजाम्यासह कारने पुण्याच्या दिशेने रवाना झाले व तेथून ते दिल्लीत पोहोचले.